लेखांक ७३.

श्री.

''बि हुजूर राजश्री जुझारराऊ दा। बे॥

दतो बापुजी लेहोनु                       त्रिंबक रंगनाथ लेहोनु
दिधले की देसमुख व                    दिल्हे की देसमुख व पांच
पांच जे सांगतील ते                      जे सांगतील ते आइकोन.
आइकोन. जरी पांचाचे                  जर पांचाचे न आइको
न आइको तरी गोताचा                 तरी गोताचा खोटा.''
खोटो.

लेखांक ७४.

श्री.

''अज स्वारी राजश्री बाबूराव दत्तो नामजाद सुभा किले हाय ता। मोकदम मौजे पाबे ता। कानदखोरे सु खमस खमसैन मया व अलफ. मौजे मजकुरी परभीकीचे सेत आहे. ते सरकारांत अनामत ठेविले आहे. त्याची लावणी जाली पाहिजे. त्यास तुह्मी गावातील कुळें लाऊन कीर्द करवणे. ज्याप्रमाणे सरकतीची बोली करून लावणी कराल, त्याप्रमाणे उगवणी होईल. तरी कुळें लाऊन लावणी करणे. बोली प्रो। चालविले जाईल. जाजती अजार लागणार नाही. जाणिजे छ १० माहे सवाल''