लेखांक ४७.
हू
१६४८ चैत्र शुध्द ६.
'' ई कौलनामे अज रख्तखाने कोट जंजिरे दंडाराजपुरी ता। देशमुख व देशपांडियानि व मोकदमानि व रयानि त॥ कानदखोरे सु॥ सीत असरीन मिया व अलफ. बादे कौलनामा ऐसा जे :- कुंवरजी सिरका याणें ता। पौड खोरे एथें जमाव करून, कसबे पालीची पेठ मारून नेली. ह्मणौन तुह्मीं धाशत खादलीत की, जंजिरे तरफेन स्वारी मावळांत होईल. ऐसी धाशत घेऊन, परागंदा होऊं लागलेत. सबब गोपाळ बजाजी मजमदार सीमाहाल मावळे जुजूर एऊन तुमची हकीकत जाहीर करून, कौलबाबें अर्ज केला. बराय अर्ज खातरेस आणौन तुह्मावर मेहरबान होऊन कौल सादर केला असे. तर तुह्मी बेशक होऊन माहालीं एऊन, कीर्द आबादानी करून, सरकारचे कामकाज चालऊन सरकारचे अमलदारासी रुजू असत जाणे. कोणें बाबें शक अंदेशा न धरणें. दरीं बाब कौल असे. प्रा। हु॥ र॥ खुश मा। जबानी रामजी रायवड अफराद रा। छ ४ माहे साबान मोर्तब सुद.''
लेखांक ४८.
श्री.
१६४८ ज्येष्ठ शुध्द १४.
'' आज्ञापत्र राजश्री लक्ष्मण त्र्यंबक तांबे मोकदम मौजे पाबे ता। कानदखोरें सु॥ समान अशरीन मया अलफ. मौजे मजकूर देशमुख याजकडे इनाम आहे. त्यासी वतनसमंधें तुजपासून सेरणी घेतली आहे. त्याचा दोनी तकसिमा ऐवज बाकी राहिला आहे. तो देशमुख मागत असतां देत नाहींस; ह्मणौन हुजूर विदित जाले. तरी सेरणी दिवाणांत भरून घेतली. त्याचा ऐवजास खलेल करावयास प्रयोजन काये ? याउपरी दोन तकसिमा ऐवज राहिला, तो देशमुखाकडे देणे. फिरोन बोभाट येऊं न देणें. बोभाट आलिया मुलाहिजा होणार नाहीं. ऐसे पस्ट समजोन वर्तणूक करणे. छ. १२ सवाल.''