लेखांक ४५.
श्री.
१६४३ माघ वद्य ७.
'' मा। अनाम कमाविसदार सेरी खेडेबारे यासि दताजी सिवदेव सु॥ इसने असरीन मया अलफ. मौजे पाबे र्ता। कानदखोरे हा गांव देशमुख र्ता। याचा इनाम आहे. त्यास पूर्वी गाव अमानत केला होता, ते समई दिवाण सेरी जमीन सात बिघे केली होती. हाली इनाम गाव देशमुखास आहे. तेथील सेरी करावी ऐसी नाहीं. तरी तुह्मी सेरीविसीं कथला एकदर न करणें. या कागदाचे प्रति घेऊन असल देशमुखापासी देणे छ २० रबिलाखर.''
सुरु सुद.
लेखांक ४६.
श्री.
१६४६ चैत्र वद्य १४.
''राजश्री नारायणजी जुंझारराव देशमुख
ता। कानदखोरे गोसावी यांस :-
ε अखंडित-लक्ष्मी-आलंकृत-राजमान्य-स्रों रंगोजी इंदलकर हवलदार व कारकून किले प्रचंडगड जोहार व आसिर्वाद सु॥ अर्बा असरैन मया अलफ. बाळोजी रेणुसा व गोदजी रेणुसा ऐसे हरदो जण नेरीपासी राजश्री पंतसचिवाकडे गेले होते. त्यानी हर दो जणाचा करीना लेहून घेऊन, किले मजकुरां पाठविले आहेत. या हर दो जणाचा कजया वारावा लागतो. तरी तुह्मी देखत कागद गडास येणें. बहुत काय लिहिणें छ २७ रजब हे विनंती.''