लेखांक ४९.
श्री.
१६४८ आश्विन वद्य ११.
'' मा। अनाम देशमुख व देशकुलकर्णी ता। कानदखोररे यांसी नारो शंकर सचिव सुहूर सन सबा अशरैन मया अलफ. बालोजी रेणुसा मोकदम मौजे पाबे ता। मा।र याचे घर व ह्मैस १ एक यास पाळक देणे. ह्मणून पेशजी तुह्मास एक दोन आज्ञापत्रें सादर केली होती. ऐसा असता, तुह्मी बालोजीस वणी घरटकीयाचा तगादा लाविला आहे. ह्मणून हुजूर विदित जालें. त्यावरून हें पत्र तुह्मास सादर केलें असे. तरी तुह्मास पेशजी पत्र सादर केले असता बालोजीस तगादा लावावयास गरज काय ? याउपर बालोजीस घर व ह्मैस १ एक पाळक देविले असे. तुह्मी सदरहू प्रो। यास पालक देत जाणे. सदरहूचा तगादा लावित न जाणे. जाणिजे छ १४ सफर पा। हुजुर.''
लेखांक ५०.
श्री.
१६४८ कार्तिक शुध्द ८.
तालिक
'' माआनाम देशमुख देशकुलकरणी ता। कानदखोरें यास नारो शंकर सचिव सु॥ सबा अशरीन मया अलफ. महादजी बीन बालोजी रेणुसा मोकदम मौजे पाबे ता। मा। याचा बाप बालोजी रेणुसा याणें साताराचे मुकामी हुजूर येऊन विदित केले की, आपल्यास दोघे पुत्र आहेत. वडिल भिवजी व धाकटा माहादजी. त्यास मोकदमीच्या वतनामुळे घर ह्मैस पुरातन पालक आहे. ते भिवजीचे वाटणीस दिल्हे. धाकटा माहादजी यास पालक चालत नाही व आपल्यासहि वतनाकरितां शेवा पडते. तरी स्वामीनीं कृपाळु होऊन महादजीस पालक दिल्हा पाहिजे ह्मणऊन विनंती केली. त्यावरून मनास आणितां यास वतनसमंधे सेवा बहुत पडते. याकरितां माहादजी रेणुसा यास मौजे पाबे ता। मा।र येथे घर १ एक व ह्मैस १ एक पालक दिल्ही असे. तरी तुह्मी सदरहूप्रमाणे पालक यास व (या) च्या पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवीत जाणे. प्रतिवर्षी नूतर पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रति लेहून घेऊन असल पत्र भोगवटियास महादजीजवळ परतोन देणे छ १६ रबिलावल.''