लेखांक ४३.
हू
१६४३ चैत्र वद्य ९.
'' ई कौलनामे अज रख्तखाने कोट जंजिरे दंडाराजपुरी ता। रयानि तपे कानदखोरे सु॥ इहिदे असरैन मिया व अलफ. बादे कौलनामा ऐसा जे :- सीमाहाल मावळची रयतीने धासत खाऊन परागंदा होत असे. तर रयतीस कौल सादर करावा ह्मणऊन, गोपाळ बजाजी मजमूदार सीमाहाल याण्हे अर्जदास्त पाठविली. त्यावरून तपे मजकूरच्या रयतीस कौल सादर केला असे. सरकारतर्फेने तुह्मास तसवीस लागणार नाहीं. तरी बेशक होऊन आपले गांवचे गांवीं एऊन वसाहत करून कीर्द आबादानी करणे. आण तुह्मी असणे. कोण्हे बाबे शक अंदेसा न धरणें. दरी बाब कौल असे. पा। हू॥ रा। बहादूर जबानी भिकाजी नाईक बोरकर अफराद रा। छ २२ माहे जमादिलाखर मोर्तब सुद.''
लेखांक ४४.
श्री.
१६४३ माघ वद्य ३.
''आज्ञापत्र समस्त-राजकार्य-धुरंधर विस्वासनिधी ता। सेरी करेपठार का। सिवापूर सु॥ सन इसने असरीन मया अलफ. मौजे पाबे तर्फ कानदखोरे हा गांव देशमुखांचा इनाम आहे. तेथें तुह्मी दिवाणाची सेरी करून ह्मणून येऊन गांवांमधें दहशत घालितां, तरी मौजे मजकुरी पेशजी सेरी होती. त्यास गांव देशमुखाचा इनाम, देशमुखाचे दुमाला केला असे. याउपरी तुह्मी मौजे मजकुरी सेरीचा कथला न करणें. खालिसा गांवीं सेरी पुरातन असेल तें करणें. इनामामधें कथळा करीत नव जाणे. जाणिजे छ १६ रबिलाखर.''
सुरु सुद.
------------
