लेखांक १७.
१५५३ पौष शुध्द १२
''अज खतखाने खुदायवंद ख्॥ खुदावंद ख॥ खूलीदयामदौलतहू बजानीबु बाबाजी जुंझारराऊ देसमुख तपे कानदखोरे बिदानद सु॥ इहिदे सलासैन अलफ. अर्दास छ १९ जमादिलावल र॥ छ ३० मिनहू एदिलशाहाचे काही जातीचे बाबें बयानवार तपसिले लिहिले व किलेकरीयाची खबर बयानवार लिहिली, मालूम जाली. किलेकरी तपे म॥ कबज केले ते एथीले हुकुमे नाही. मुलुकगिरीबदल कोरे सिकियाचे फर्मान हुजरून त्यानजीक पेसजी पाठविले आहेत, त्यापैकी दरम्यान च त॥ म॥ नाव घालुनु ऐसा अमल केला असेली. हाली हेजीब पंडितीं हुजुरतीचे बंदगीस मालूम करून, ताजा ताकीद फर्मान घेउनु पाठविला आहे. व हजरती साहेब बहुत गरम जाले की, बगर रजा ऐसी कामे करितो. वख्त गेला. हाली याचा याबदल तहमुली केला. अमल जालयावरी याचा नतीजा यास पावेल. तू दौलतखा नफर आहेस. किलेकरियास बाहेर घालून, रयती लोकांचा दिलासा करून, माहालीची उगवणी करून रसद हुजूर पाठविणे. किलेकरी जोरी करितील तरी तुवा लोक मेळउनु संगीनाती करुनु सर्तीसी जाब देणे. मुलाहिजा न धरणे. जेणेकरुन तुझी सरफराजी होए ऐसा अंमल करणे. किलेकरी जे उचापती केली असेली ते फिराऊन घेणे. ए बाबे फर्मान हि पाठविला आहे. मोर्तब सुद.''
तेरीख १० माहे जमादिलाखर