लेखांक १५.
१५५१ कार्तिक शुध्द १४
''अज रख्तखाने खुदायवंद ख॥ खुदावदखान खूलीदयामदौलतहू बजानेबू बाबाजी जुंझारराऊ देसमुख त॥ कानदखोरे बिदानद सु॥ सलासैन अलफ अर्दास छ ३ र॥ छ ८ रबिलोवल लिहिले की, किलेकरी त॥ मजकुरास तोसीस लाविली आहे, गाऊ मारिताती व मोजे सणवडीची गुरे वळुनु नेली आहेती ह्मणौनु लिहिलें, तरी बअमल दिवाणचे बंदगीस मालूम करुनु फर्मान लिहविला. सिके विले लाविला आहे; तोवरी सिदी अंबर अबदूर साहेब हवालदार किल कोंढाणा त्यास किताबती पाइविली आहे जे, त्यास घेउनु सरंजाम करुनु घेणे. तोवरी फर्मानास सिका होउनु फर्मानाहि पाठवितो तुवा मर्दाना होउनु दिवाणकाम चालवणे. काही शक न धरणे. अवघी सरंजामी करुनु फर्मान पाठवितो. मोर्तब सुद रुजू सुरुनिवीस तेरीख १२ माहे रबिलोवल.''
---------------
लेखांक १६.
१५५२ मार्गशीर्ष वद्य ५
''अज रख्तखाने खुदायवंद ख॥ खुदावदखान खूलीदयामदौलतहू बजानेबु बाबाजी जुंझारराऊ देसमुख त॥ कानदखोरे बिदानद सु॥ सलासैन अलफ अर्दास छ ११ जमादिलोवल र॥ छ १२ ज॥ लिहिले कीं, साहेबीं तकवेतीचे खुर्दखत सादर केले ते सिरीं धरिले, सरफराज जालो, तेथे रजा फर्माविली कीं, त॥ म॥ चे तसविसीबदल सिदी अजमास किताबती पाठविली आहे ? त्यावरुनु सरंजामी होईल ते खबर हुजूर लिहिणे. ह्मणौनु रजा. तरी मौजे काळवडी त॥ म॥ तेथील प्रजा कामसेटी काटकर बकाल व लुखोजी लिह्मण साल गु॥ त॥ खेडाबराहून आणौनु मौजे म॥ निमे त्यास देउनु मामूर केले होते. त्याच्या घरावरी बलवंतरायें माणुसे से सवासे पाठउनु घर जाळिले. घरामधे वित जळाले. त॥
बैल गाडे व हणम १०
ह्मैसी १०
ह्मैसीची वासरे ८
जोरी ४ च्यार मण कुपे २
सदरहू जाळीले व दोघे कुणबी जखमी केले. ते जेर आहेती व अवरत माना ४ जखमी केलिया आहेती. त्या हि जेर आहेती. याखेरीज गला व वस्तभाऊ मोबलग जळाली. याकरिता मौजे म॥ व आणीकहि कितेक गौऊ बेदिल जाले आहेती. ऐसी खराबी होते व साहेबाची किताबती माहालास पैवस्ता जाली, ते कारकुनानजिक पाठविलीयावरी त्यावरी कमीनास माहालदार पाठउनु किलेकराची गुरे मागत होते. त्यावरी कमीने ब॥ जाबिता माहालदाराचे हवाला गुरे केली. ते गुरे व हे गुरे सिदी अजमें आपले निसबती ठेविली. त्यावरी किलेमजकुरास माहालदार पाठउनु रयतेची गुरे किलेकरापासुनु आणविली. गुरे सुमार ११४ बाकी किलेकरी निवडुनु ठेविली. गुरे सुमार १०२. ए बाबे तकवा देउनु सिदी बोलिले आहेती कीं, गुरे राहिली आहेती ते आणौनु व रयतीची रयतीस देउनु आणि मग किलेकराची गुरे किलेकरास देउनु. व सिवेचे बाबे माहालीच्या कारकुनास किताबती लिहिली आहे कीं, दो चौ रोजामधे एउनु निवाडा करुनु ह्मणौनु बोलिले आहेती. त्याची तालीक बंदगीस पाठविली आहे. त्यावरून रोसन होईल. व एदिलशाही लोकी एउनु प॥ शिरवळ कबज केले आहे. कोठे बदकटी केली आहे. त्यापासीं घोडी हजार २००० एउनु बैसले आहेती. तेही कमीनास खुर्दखत सादर केले आहे. ते ऐन खुर्दखत बंदगीस पाठविले आहे. त्यावरुनु रोसन होईल. व त॥ म॥ किलाचे तसविसी ब॥ तजावजु जाले आहे व कितेक गावीच्या प्रजा जागा जागा जाउनु राहिले आहेती. आजी संचणीचा वख्त आहे. रयतीस लुगडी पाठविली पाहिजेती. व तकवा दिलदारी पाठवणे. जागा जागा प्रजा गेलिया आहेती त्याहि एतील. ए बाबे दिरंग न करणे ह्मणौनु लिहिले. मालूम जाले. सिदी अंबरास किताबती पेसजी पाठविली होती. त्यावरून तेही कामावरी एउनु बहुतेक तह केला आहे. काही होणे आहे याबदल हाली किताबती पाठविली आहे त्यावरुनु अवघी सरंजामी होईल. पेस्तर तुह्मी आपले तरफेन कुसूर हो नेदणे. एलिदशाही लोकांचे बाबे लिहिले. तरी तेही सिकस्त खादली. तुह्मास मालूम जाली असेल. हाली आपले तरफेची नामजादी विजापूर पावेतोवरी गेली आहे. तुह्मी काही त्याची शक न धरणे. तू दौलतखा आहेसि. दौलतखाईस तकदीर केली नाही. हाली लावणीचा वख्त आहे. दिल घालुनु लावणी करून साल दरसाल कीर्दीमामूरी होन दस्तास माहाल ए ऐसे करणे. तुज हुजरून लुगडी पाठविलीं आहेती. हे घेउनु आपला खातिरजमा करणे मोर्तब सुद.''
रुजु सुरु निवीस
तेरीख १९ माहे जमादिलोवल