लेखांक १८.
१५५६ कार्तिक वद्य १२.
'' अज रख्तखाने खुदायवंद सिदी अजम सिदी अंबर अंबर हवालदार किले कोंढाणा खूलीदयाददौलतहू बजानेबू कारकुनानि त॥ कानदखोरे बिदानद सु॥ खमस सलासीन अलफ बाबाजी कान्होजी जुंझारराऊ देशमुख त॥ म॥ यासी इसाफती अजरामर्हामतीबद्दल निवाले दिधला असे. मवाजे दोनी २ एकून बेरीज टके ८५९॥१०॥
मौजे विहीर अज रकम टके ३०९॥. |
मौजे अत्रोळी अज रकम टके |
एकुनु सदरहू मवाजे देहे २ अजरामर्हामती दिधले असती. बाब महसुलेसी देखील बाजे बाबा कुलबाब कुलकानू दिधले असे. दुमाला कीजे. दर हर साल ताजे खुर्द खताचा उजूर न कीजे. तालीक देउनु असली फिराउनु दीजे. मोर्तबु''
तेरीख २५
जमादिलोवल