मग फलकुटीयाच्या बोलीला निकाल करून देऊ. ऐसे रामाजी आपाजी देशपांडे बोलिले. त्यावरून हुकूम केला. मग त्याणीं देवळास जाऊन ते मास व फलकुटे काढिले. मग बोली ती तैसीच राहिली. त्याउपरी बावांची वेथा बळावली. देव धर्म करिता काही ठिकाण लागले नाही. ऐसा सोध करितां पंचाक्षरी देवरुसी आणून, पर माहालेच्या तोंडें रेणुसीयाची लाग ऐसी खरी जाली. मग त्याच्या विद्यमानें श्रीमेंगाई व श्रीजुगाई याणींहि ईनत्या प्रसाद दिल्हे. तेव्हा चडउतार होऊ लागला. मग ऐसे करितां पौडखोराचा भगत जानाईचा आणून, माहालचे मेंगाई व जुगाईला थला करून बकरे दवेळीं द्यावें ऐसे केले. ते देऊन बावास उतार पडिला. तेव्हा दुसरे जत्रे कारणे त्यास सांगितले कीं अजी जत्रा करिता, तरी फळकुटीयाची बोली विल्हास लावणे ह्मणोन सांगोन पाठविले. त्यांस ते बोलिले, हे जत्रेविणे खोळंबा आह्मास काय ? वारंवार बोली होते ह्मणून बोलिले. त्याजवरून आपल्या चित्तांत आले कीं मागती मास बांधोन ठेवितील आणि श्रीचा कोप होईल. ऐसे चित्तांत आले. त्याजवरून ते समई सांडी केली. मग तिसरे जत्रेचे वेळेस निकड करून सांगितले. त्यावर बावाचे वेथेस थोडा बहुत उतार होता. तो राजश्री खंडोपंत याजकडे हरनाक माहार जाऊन वर्तमान रेणुसा याविसीं सांगितले. त्याचा मजकूर आपल्या काही ठावका नव्हता. त्याउपरी आह्मी त्याच्या भेटीस गेलो. तो त्याणीं सर्व वर्तमान सांगितले. त्याजवरून आह्मास त्याणीं सांगितले की, हरनाक बोलऊन घेऊन ऐसा ते बोली कार्याची आहे. त्याजवरून हरनाक बीन राघनाक इबिन हरनाक माहार मौजे पाबे ता॥ कानदखोरे सु॥ इसन्ने अर्बैन मया अलफ कारणे साहेबाचे सेवेसी तकरीर लेहून दिल्हे ऐसीजे, आपला वडिल हकनाक, त्याचा लेक पाकेनाक, गावीचा कारभार करीत होता. त्यासी ते समई दिवाण मलकाची पातशाही होती. तेव्हा गावात पेठ होती. लिंगाईत कारभार चालवित होता. तेव्हा फळकुटे जत्रेचे व पारधीचे देशमुखास आणून देत होते. हाली रेणुसे पाटिलकी करितात. त्याचा वडिल भिकाजी गावीं होता. परंतु पाटीलकीचा डांग त्याजकडे चालत नव्हता. व पाबेकरहि गावीं होता. त्याजकडेहि पाटिलकीचा काइदा चालिला नाही. व रेणुसी याणीं पाटिलकी घेतली अगर देशमुखानीं दिल्ही हे आपल्यास दाखल नाही. भिवजी रेणुसाहि गावांत होता. परंतु पाटिलकी दिल्हे- याचे कागदपत्र दिवाणचा अगर देशमुखाचा आपल्यास ठावका नाही.