Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

नरसोजी खरा आहे मग इनिसानी हरदोजणास हरकी गुन्हेगारी बाधोन तुरक कैद केला नरसोजीबावास हुकूम केला की पाछायास अर्ज करून तुज निरोप देतो त्याजवर नरसोजीबावास सागितले की चोवीस व्होन हरकी तुजवर करार केली नरसोजीबावानी अर्ज केला की चोवीस व्हन आपणासी फिटत नाही मेहरबानी करून सोड दिल्ह्याने पैका फिटेल इनिसा बोलला जे पाछाचे हुकुमाने करार जाहले ते दरम्यान आपल्याच्याने सोडवत नाहीं तुझा पैका फिटेना तर आपण हावाला घेतो तुजला फिटतील तैसे फेडणे आणि आपले वादे मारून काढणे त्याजवरोन नरसोजीबावा याणीं अर्ज केला की साहेबाचा हुबर कसबे मजकूर आहे त्यास हुकूम दिल्हा पाहिजे त्यावरून हुबर यास कागद दिल्हा की नरसोजी आपला मुदाई दावा करून मारून काढील त्यास मुजाहीम तुह्मी न होणे ह्मणऊन कागद दिल्हा नरसोजीबावानी कागद घेऊन व इनिसाचा निरोप घेऊन कसबे मसूरचे रानात आले गावात पैवसती हेयना माग किवळास गेले नावजी पाटील किवळकर यासी भेटून वर्तमान सागितले की आपली तक्षीम निमी देतो चोविस व्होन द्यावे आणि तुरक मारून काडावे आणि आपली पाठ राखावी त्यास नावजी पाटील बोलले की आपणा आठोप होत नाही मग रिसवडास गेले तेथील ही पाटलास वर्तमान हे च सागितले त्याणीं उत्तर दिल्हे की आपलेयाचेनही आटपत नाही तेथून नेवरीस भालेराव याचे येथे गेले त्यास हे वर्तमान सागितले त्याणीं ही उत्तर दिल्हे जे आपलेचेन आटपत नाही मग त्याचा निरोप घेऊन कुमठेस गेले तेथे हाणगोजी पा। जगदळे याची भेट घेतली त्यास सागितले जे आपले वतन तुह्मास देतो चोवीस व्होन द्यावे आपली पाठी राखावी आपले मुदाई मारून काडावे येतकी बोली शफतपूर्वक जाहली हणगोजी पाटिलानी कबूल केले त्यास भानजीपत कुलकर्णी कुमठेकर यासी हाणगोजी पाटीलानी वर्तमान सागितले त्याणीं उत्तर दिल्हे जे रजावदीने दिल्हे आहे याचे प्रमाण काय तुह्मास घेणे असल तर यास घेऊन मसूरास जाणे तेथे याचे भाऊबद व बयतेबलुते असतील त्याचे विदमान हा जे वतन देईल ते घेणे इतकीयाउपरी नरसोजीबावा व हाणगोजी पा। उभयता निगडीचा डोगरास आले तेथे राहून रावजी खोत हणमतवाडीकर यास बोलाऊ पा। तोही वाडीहून निघोन डोगरास गेला उभयताची भेट घेतली नरसोजी बावानी रावजी मजकुरास सागितले जे गावात जाऊन बयतेबलूते आमचे कोणीहि असेल तर त्यास वर्तमान सागा जे भेटीस येणे याउपरी रावजी ब्रह्मपुरीस येऊन नाहावियास वर्तमान सागितले आपण माघारा वाडीस गेला नाहावी गावात येवून सुतार यास वर्तमान सागितले सुताराने ठाकूर वगैरे यास वर्तमान सागितले चवघानी चित्ती गोष्ट धरून कोणास नकळता वाडीचे रानात गेले तेथे रावजी खोताने उभयता पाटिलाच्या व चवघाच्या भेटी केल्या हणगोजी पाअलानी चवघा बयतेसी विचारल की नरसोजी पाटील आपणासी वतन देतो तुमचे विदमान देईल तर आपण घेईन चवघाजणानी उतर दिल्हे जे आपणास विचारिता तर आह्मी नरसोजीबावास विचारतो की तुह्मी यास वतन किती देता नरसोजीबावा बोलले जे निमे वतन आपण देतो