Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
चोवीस व्होन याणी द्यावे आणि आपली पाठी राखावी मुदाई मारून काडावा असे बोलले मग चवघाबयतानी हाणगोजी पाटलास सांगितले जे वडीलपणाचा मान व पांढरीखाली जे कागदे असतील ते खेरीज करून निमी तक्षीमी तक्षिमीचा विभाग निमीचा तारोतार घेणे त्यावरून त्याणी मान्य केले तूं जातीभाऊ आहेस नरसोजीस जतन करून मुदाई मारून काडणे आणि उभयता भाऊ देणे वतन अनभवणे त्यावर हाणगोजी पाटील बोलल जे बोलीप्रमाणे सनदपत्र पाहिजे इतकी बोली करार जाहली त्यावर बयत्यानी कमलाकर भटास बोलाऊन नेहले त्याचे हातून बोलीप्रमाणे कागद दिल्हा व हाणगोजी पाटलाचे बोलीप्रमाणे इनामपत्र लिहून घेतले त्याउपरी तुरक मारून काडावे या विचारास गेले तुरक मारिले तो मुजावरानी पाठिलाग केला तिघे मुजावर मारीले तो हुबरानी कुमक केली याउपरी मलिकइनीसाचा कागद नरसोजीबावापासी होता तो हुबरास दिल्हा हुबर फिरोन माघारा गावास आला मग दुसरे दिवसी हुबरानी नरसोजी पाटील व हाणगोजी पा। यास आणावे असी तरतूद केली उभयता ते वेळस गेले नाहीत गावातील तुरकाचा झाडा जाहलियाउपर मग उभयता गावास आले तर वाडीत राहीले बोली प्रमाणे आपले वडील विभाग निमी तक्षीम व वडीलपणा कानू कायदा वडीलपणाचा खात आले आणि तेही निमी तक्षीम निमी तक्षिमेचा विभाग खात आले असे उभयता चालत आले किती एक दिवसा पिसाळ वादास उठले आपले वतन ह्मणऊन त्यास नरसोजीबावा अशक्त जाला होता त्याचे लेक उभयता तानाजी बावा व धाकटा सुलतानजी बावा फुडे पिसाल चावदास तानाजीबावा पाटणास गेले तेथे पाटणचे स्थली पिसाल खोटे करून आले गावास येऊन आपला विभाग व वडिलपणा खात आले आणखी फुडे पिसालानी दावा करून तानाजीबावास मारिले त्या वेळेस पाठीराखे होते तेही पळून गेले कुमठेकर ही गावात होते त्याणी ही कुमक केली नाही कोणाचे अनुसधे मारिल हे हि कळले नाही पुढे मागती कुरबावीचे स्थलास आपल वडील जावयास कोणी नाही सुलतानजी बावा शाहाजी राजे याचे अमलामध्ये मारील गेले सुलतानजीबावाची बायको कासिगावी होती आपले आजे म्हादजीबावा रायगडी होते त्या उपरी तिमाजीपत कुलकर्णी याणी म्हासाजी पाटलास बोलाऊन आणोन त्यास सागितले जे कुरबवीस तुह्मीं जाणे कासावा बायकोस पाठवितो येत नाही मग म्हासाजी पाटील बोलला जे वादाचे कर्जा पैका दडला तर कोण द्यावा आणि खर्चास काय करावे तिमाजीपत कुलकर्णी बोलले जे पैका दडला तर आपण देईन व खर्चास ही आपण देतो तेव्हा चोवीस व्होन म्हासाजीबावास खर्चास देऊन कुरबावीस रवाना केले कुरबावीस्थली तुरक व पिसल खोटे करून त्याचे पत्र म्हासाजीबावापासी राहिले त्या पासून कुमठेकर आपले पूर्व पध्दती प्रमाणे चालत आले पुढे कासाई पाटलीण व सुलतानजी पाटील हे उभयता पाटीलकीचा कारभार करित आले ते वेलेस वडीलपणाचे कायदे नागराखाली अनभवीत आले त्या आलीकडे आपले आजे म्हादजीबावा हे ही नागर नागरा खालीं कानूकायदे अनभवीत आले त्या अलीकडे आपले चुलते शामराव यानी व सुभानजी पाटील हे उभयता गावकी करीत असता कानूकायदे वडीलपणा नागर अनभवीत आले त्या अलीकडे आपण कारभारास उभे राहीलो त्यापासून आजपर्यंत वडीलपणा नागर नागराखाली कानूकायदे अनभवीत आलो आणि हणगोजीबावाचे इनामपत्र वडिलापाशी होते ते गेले त्याचा कागदपत्र आपणापासी नाही प्रस्तूत कुमठेकर यानी वडिलपणाची कायदेसीर खटखट माडली तर आपल्या वडिलावडिलानी काही सागत आले नाहीत आगर कायदेचे दाखला आडलला नाही ही तकरीर लिहून दिल्ही ताजा कलम हारकी बाबत चवदासई व्होन कुमठेकरानी द्यावी त्याजपैकी सावे व्होन दिल्हे बाकी पावणे तेरासे राहीले असे वडिलांनी सांगितले