Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

त्यावरी राजश्री स्वामीने हि इमान देऊन डोईवरी हात ठेऊन बोलिले जे भोसल्याचे वशी जो राज्य करील त्याने तुमचे वशपरपरेने चालवावे ऐसा इमान दिल्हा त्यावरी जमाव करून राजश्री समागमे प्रतापगडास गेले अफजलखानाचे भेटीचे समई आपले बाप व चुलते धारकरियामधे नेमून बा। घेतले अफजलखान जिवे मारिला कुल फौज लुटिली ते समई आपल्या वडीलानी बहुत शर्ती करावयाची ते केली ते प्रसगी खडोजी खोपडा पाडाव जाला त्यास राजश्री स्वामीनी शास्ती केली त्यावी शास्तीखान पुणियास आला ते समई राजश्री स्वामी चालोन गेले तेव्हा हि आपले बाप व चुलते समागमे गेले होते तेथे हि शर्ती करणे ते केली त्यावरी राजश्री स्वामीनी हि बोलिल्या बोलाप्रमाणे चालविले पानमान आपला आपणास देत आले त्यावरी राजश्री स्वामी थोरले कैलासवासी दिलीस अवरगजेब पातशाहाचे भेटीस गेले ते समई हि आपले बाप सर्जाराव समागमे गेले होते तिकडून आलियाउपरी राजश्री कैलासवासी स्वामीनी चजीप्राते मोहीम केली भागानगरास गेले तेथून पुढे कर्नाटक हस्तगत केले ते समई हि आपले बाप सर्जाराव जमागमे गेले होते आपल्या वडिलानी कोण्हेविसी एकनिष्टेस अतर केले नाही राजश्री स्वामीनी आपले सर्वस्व चालऊन खोपड्या अगोधर पानमान दिल्हा आहे त्यावरी अवरगजेब पातशाहा तुळापुरास आला त्याचे पुत्र अजमशाह सिरवळनजिक येऊन राहिले होते तेथे किले रोहिडा घ्यावयाचा प्रसग पडिला की किलाची पाने घेणे ते समई आपले बाप सर्जाराव जेधे याणी पाने घेतली नाहीत खोपडीयाने पाने घेतली आणि बाळाजी नाईक खोपडे याने येऊन रोहिड्यास चौकी बैसविली ते समई गडास सिधोजी जाधव किलियास हवालदार होते त्याकडे सर्जाराव जेधे याणी माणसे पाठऊन सामान व गला रातोराती आपले तरफेचा पाठविला हे वर्तमान बालाजी खोपडे यास दखल जाले त्याणी वजीरअली सैदमजली ठाणेदार होता त्यास सागितले त्याची स्वारी मुलुकात आणिली त्याने मौजे करजीये ता। मजकूर येथे येऊन मुकाम केला आणि मौजे नाटबी व करजीये व सागवी तिन्ही गाव लुटून खराब केले बाळाजी खोपडे यास कारीस सर्जाराव यास आणावयास पाठविले त्यास सर्जाराव यास वेथा जाली होती याकरिता आपणास बाळाजी नाईकाचे हाती दिल्हे त्याणी सैदमजली जवळ आणिले त्यास सैदमजलीने ताकीद करावयाची ते केली आणि बोलिले याउपरी तुह्मी फिरवा केला ह्मणजे तुमचे बरे होणार नाही ऐसी ताकीद केली त्यास आपला मुदई बाळाजी नाईक जवळ आहे नस्ते तुफान करील याजकरिता त्या बा। आपणास गडाखाले चौकीस बैसावे लागले खोपड्यामुळे किला सी बद जाला त्यावरी किलेकरी याने पातशाहाकडे राजकारण लाऊन किला नजर केला त्यावरी चंजीप्रांते राजश्री कैलासवासी स्वामी होते तेथे आपले बाप सर्जाराव जाऊन भेटी घेतली त्यावरी राजश्री इकडे आले तेव्हा हि ताबीचे मुकामी आपल्या वडिलानी खोपड्या अगोधर पाने घेतली आहेत हे जातीचा पानामानाचाकरीणा आहे पानमान येणेप्रमाणे घेत आलो आहो त्यावरी प्रतापगड प्रसंग पडिला तेथे निर्वाह जाला नाही आपल्या वडिलानी सदरहूप्रमाणे पानमान घेत आले आहेत