Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

                                                                             लेखांक ३६४

                                                                                             
माहाराज राजश्रीं साहेब कैलासवासी याजवळ स्वारानसी सेवा केली त्यास थोरले राजश्री कैलासवासी स्वामी पुणीयास पाठविले यासमागमे आपले आजे कान्होजी नाईक स्वारानसी दिल्हे याणी एकनिष्टेने सेवा करावयाची ते केली वतनामुळे हि रुजुवातीने राहिले त्यावरी राजश्री दादाजी कोंडदेव सिवापुरास आले ते समई कृष्णाजी नाईक बादल देसमुख ता। हिरडसमावळ बारामावळामधे जोरावारीने बइते घेत होते ते समई आपले आजे कान्होजी नाईक याणी बादलास बइते दिल्हे नाही जोरावारीने तरवारेच्या बले आपल्या माहालात येऊ दिल्हे नाही यावरी राजश्री थोरले कैलासवासी स्वामी कारभार करू लागले ते समई गनीम चालोन आला याकरिता पाईच्या लोकाचा व लष्कराचा जमाव करू लागले आपले आजे कान्होजी नाईक यास बोलाऊ पाठविले तेथे हि आपल्या जमावानिसी गेले त्यावरी मावळे लोकाचा जमाव व स्वाराचा जमाव करून मौजे खलदबेलसर येथे गनीम आला होता त्यावरी राजश्री थोरले कैलासवासी स्वामी गेले याबराबरी आपले बाप बाजी नाईक याणी निशाणाचा भाला घेऊन गेले आपल्या लोकाचे व गनीमाचे भाडण जाले तेथे तरवाराची शर्ती करावयाची ते केली गनीम मारून मोडिला त्यावरून राजश्री कैलासवासी स्वामी मेहरबान होऊन आपल्या बापास सर्जाराई दिल्ही त्याउपरी राजश्री स्वामीनी मातबर जमाव करून राज्ये हस्तगत करू लागले मावळ प्रातीचे गाड किले घेतले ज्या वृधीते होत चालिले त्यावारी अफजलखान राजश्री स्वामीवरी चालोन आला तो वाईस येऊन राहिला ते प्रसगी खडोजी खोपडे पारखे होऊन अफजलखानास भेटले आणि राजश्री थोरले कैलासवासी स्वामीस धरून देतो ह्मणऊन कबुलाती केली ते प्रसगी आपले आजे कान्होजी नाईक याणी आपली माणसे व वस्तभाव पळविली ती तळेगावी नेऊन ठेविली आणि आपण व आपले बाप सर्जाराव जेधे व चुलते सिवाजी जेधे व चांदजी जेधे व नाइकजी जेधे व रायाजी जेधे राजश्री स्वामीचे भेटीस आले तेव्हा राजश्री बोलिले की खंडोजर खोपडे अफजलखानासी भेटले आपली देसमुखी यापासून मागोन घेतली तुह्मी याची भेटी घेऊन आपली देसमुखी जतन करणे ह्मणून बोलिले त्यावरी कान्होजी नाईक बोलिले की आपण देसमुखी साहेबाच्या पायावरी ठेविली आहे साहेबाच्या बर्‍याने आपले बरे हे च निष्ठा आपली आहे ऐसे बोलीले आणि इमान दिल्हा