Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३६१
श्री १६३३ भाद्रपद वद्य ५
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ३८ खरनाम संवत्सरे भाद्रपद बहुल पंचमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहु छत्रपति स्वामी याणी रा। मताजी सर्जाराऊ जेधे देशमुख भोर तपे रोहिडखोरे यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी विनतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाले लिहिले वर्तमान विदित जाले हरामखोराचे लस्करानी धामधुम बहुत च केली मुलुक वैरान जाला हरामखोराचे लोकामधे आपणामधे जुझ जाले च्यार पाच आपणाकडील पडिले त्याकडील च्यार पाच पडिले सात पाच जखमी जाले स्वामीचे पुण्ये फते जाली अमची निष्टा स्वामीच्या पायासी आहे त्याचा हिसाब धरितो असे नाही ह्मणोन लिहिले हरामखोरास नतीजा दिल्हा उतम केले पुढे हि त्याचा हिसाब न धरिता वरचेवरी टेचगा देत जाणे आपले निष्टेचे वृत्त लिहिले तरी तुह्मीं वतनदार एकनिष्टसेवक आहा तुह्मास स्वामीचे पायावेगले दुसरा अवलब नाही हा स्वामीस तुमचा भरवसा आहे ऐसे असता स्वामीकार्यास अतर कराल हे काय घडो पाहतें हरामखोराचे काहीकाबाड मारून आपले सेवेचा मजुरा करून घेणे स्वामी तुमची सर्फराजी करितील लेखनालंकार
सुरु सुद