Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

                                                                                   लेखांक १३

                                                                                  श्रीगणाधीश                                           १६१० भाद्रपद शुध्द ७

स्वस्तिश्रीनृपशालिवानशके १६१० वरशे प्रभवनामसवत्सरे भाद्रपदमास सुध्दसप्‍तमी रविवासरे तद्दिनी राजश्री माहादजी पाटील बिन सुलतानजी पाटील जगदळे गोसावी यासी स्नो॥ बाबाजी बिन गगाजी पाटील व माणकोजी पाटील बिन राऊजी पाटील जगदळे व माहादजी बिन नरसोजी पाटील व सूर्याजी बिन बापूजी पा। जगदळे पटेल मौजे शिरवडे यानी लेहून दिल्हे क्रयपत्र ऐसे जे आपला मूळपुरुश व तुमचा मूळ पुरुश हे एक घराणे व तुमचे वाटणीस गेले मसूर व आपले वाटणीस आले शिरवडे तुह्मी मसूरीची पटेलगी करित आह्मा आह्मी शिरवडाची पटेलगी करीत आहो व तुह्मी राजगडास गेलेती आणि माघे नाईकडे कुणबियानी कथळा मौजेमजकूरचे पटेलगीसी करून हरवाजी अजजाहातीदेमुसखी याची पाठी करून पटेलगीसी कथळा केला त्यासी व आपणासी बहुत कटकट जाहाली काळादुकळाचे आपणासी शक्ति नाहीं ऐसी जाहाली याकरिता नाईकडे आपल्यासी रेटेनात ऐसे जाहाले मग गोसावियापासी आपण उभे राहिलो नाईकडियासी वादवेवाद सागावा आपण पाठी राखावी व आपले वतन जतन करावे ह्मणऊन गोसावियासी विदित केले दुसरियानी येऊन पटेलगी जोरावारीने घ्यावी याकरिता मसूरची पाढरी व शिरवडाची पाढरी हे एकाची याकरिता मौजेमजकूरची पटेलगी निमे तुह्मी खावी व निमे आह्मी खावी ऐसा तह करून नाईकडेयासी वादवेवाद सागितला नाईकडे दूर केले हुजूर रा। स्वामीपासी निवाडपत्रे जाहाली नाईकडे खोटे त्यासी गुन्हेगारी बाधली आह्मी जगदळे खरे आह्मासी हरखी बाधली ते हरखीचे पैके होन ५० तुह्मी दिल्हे व याखेरीज आह्मासी हि काळादुकळाचे वाचविले आपले वौशीचे ह्मणौन जतन केले व आपल्यासी खावयासी पोटाकरिता होन ५० दिल्हे याबद्दल आपल्यासी माहारनागर व पातनश्रीफ वडीलपणाची हदमहदूद पाढरीवरी जे उत्पन्न होईल ते निमे दोनी ठाई तारोतार वाटून द्यावे व गाव समायीक लावावा ज्यासी फावेल त्याने लावणी करावी एकाची मोडी एकावरी न घालावी व आपल्या भाऊपणामध्ये दुसरे दिसो नेदावे आपण आधीं पान घ्यावे व मागे तुह्मी घ्यावी व नागर आधी आपण करावा व मग तुह्मी करावा ऐसे तारोतार पाढरीवरी उत्पन्न होईल ते दोनी ठाई घ्यावे यासी कोणी बिलाहरकती करणार नाही बाबाजी पाटिलाची विल्हेच्यानी हरकती केली तरी बाबाजी पाटिलाने साभाळावे व माहादजी पाटिलाच्याने आपलें साभाळावे ऐसा निछयो करून तुह्मास हे पत्र लेहून दिल्हे असे यासी कोणी बिलाहरकत करणार नाही अवलाद अफलाद लेकराचे लेकरी तजाऊफ होऊ तरी श्रीची आण असे व आपल्या वडिलाची आण असे हे क्रयपत्र सही सु॥ समान समानीन अलफ छ ७ माहे जिलकाद व नाईकडियाचे लिगाड जे पडेल ते तुह्मी वारावे आपण पाठी राखावी हे लेहून दिल्हे क्रयपत्र सही वळी सुमारे ६१ एकसष्टी रास

(निशाणी नांगराची)