Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ६१.
स. १७६८ ता. ६ एप्रील. श्री. चैत्र वद्य ४ शके १६९०.
राजश्री जयराम पांडुरंग का।दार माहालनिहाय प्रांत मावळ (?) गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेषः पा रतलाम येथील मजमूची असामी बापूजी गोपाळ नि।। राजश्री चिंतो विठ्ठल यांस पेशजी दिल्ही आहे. त्यास सालमजकुरापासून करार-करून दिल्ही असे. तरी त्याचे हातें मजमूचें काम घेऊन वेतन सालिना पेशजीचे सनद-प्रमाणे महालमजकूरचे ऐवजीं साल-दरसाल पावीत जाणें. आत्फगी-या व मसालची-ची नेमणूक पूर्वी करून दिल्ही आहे त्याजप्रों चालवणें. छ १८ जिलकाद सु।। समान सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंति.