Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                 पत्रांक ५७. 

स. १७६७ ता. १ नोव्हेंबर.                                                  श्री.                                                  कार्तिक शुद्ध १० शके १६८९

राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसि अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत. विनंति उपरि. येथील कुशल जाणून स्वकिय कुशल लिहित जावें. विशेष. आपण पत्रें छ १८ जमादिलावलचीं पाठविलीं तीं पावलीं. पत्रों बंदोबस्ताचा अर्थ कितेक लिहिला व राजश्री बाळाजीपंत यांस तुम्ही लिहिलेत त्यांनीं सविस्तर अर्थ सांगितला. पेशजी बाजीनरसी गंगोबाच्या विद्यमानें नजरेचा जाबसाल बोलत होते ते गोष्ट श्रीमंताच्या ध्यानांत आहे. त्यास आम्हीं मागील देण्यास सेर [?] सालचा ऐवज झाडून घेऊन पेस्तर साल मागतों तेथें नजर देऊन पुढें फौज ठेऊन बंदोबस्त करणें या गोष्टी जरूर आहेत. हा सर्व अर्थ खावंदास समजाऊन करणें तें करावें. आम्हीं येथील निर्गम करून खावंदाकडे तुमच्या लिहिल्यावरून एतच आहों. परंतु थोरले श्रीमंत आनंदवल्लीस आहेत. त्यास त्यांची भेट घेऊन पुण्यास यावें किंवा परभारें यावें या गोष्टी सला पोख्त, पेच नपडे, ते ल्याहावी. पेशजीचे गृहस्त बोलत होते तें खोटें. आपल्या बोलण्यांत आमचें बोलणें यैसीं हस्ताक्षरें पत्रें श्रीमंतास व बापूस पेशजी एक दोन पाठवलीच आहेत व हालीं तुम्ही लिहिल्या-प्रमाणें दोन पत्रे पाठविलीं आहेत. वरकड वर्तमान बाळाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल. +आम्हीं लिहिलेप्रमानें सत्वरच येतों. या छ ८ जमादिलाखर बहुत काय लि।। हे विनंति.