Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४८.
१७६७ ता. २४ आक्टोबर श्री. १६८९ कार्तिकशुद्ध २
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसिः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो माहादजी सिंदे दंडवत. विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहित जावें. श्रीमंत१ इकडे आले त्यासमागमें राजश्री २आबाजीपंतहि आले. भेटी जाहल्या. पंत मशारनिलेनीं या प्रसंगी बरीच मेहनत करून श्रीमंताची मर्जी ठिकाणी आणिली. श्रीमंतासह आम्हीं कुच करून नर्मदातीरास आलों. पुढें येथील भाव कितेक राजश्री बापूस३ समजावें याअर्थे राजश्री निळो गोपाळ पाठविले आहेत, इकडील सर्व अर्थ सांगितल्यावरून कळेल. राजश्री आबाजीपंत यांनी कितेक सांगितले तें लिहिलें. ज्या गोष्टीनें आमचें बोलणें श्रीमंताजवळ ठीक राहून बोलल्या गोष्टीप्रमाणें घडे तें तुम्हीं राजश्री बापूस सांगून करावें. इकडील संशय कोणेविसीं चित्तांत न आणावा. रवाना छ ७ जावल++बहुत काय लिहिणे ? लोभ कीजे हे विनंती.