Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४४.
इ. स. १७६७ ता. ८ सप्तंबर श्री. भाद्रपद शुद्ध १५ शके १६८९
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी
यांसि------------------------------------------
अखंडित लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो माहादजी शिंदे दंडवत. विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असले पाहिजे. विशेष बहुत दिवस जाहले तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी सविस्तर लिहून पाठवावें. जातेसमई आपले आमचें बोलणें कितेक अर्थे–करून जाहलें त्याच लक्षावरी आम्ही कायम असो. दरम्यान कितेक गोष्टी लौकिकांत येतात त्या आपणास कळोन संशय आपलें चित्तांत असेल; त्यास त्या गोष्टी झाडून मिथ्या. आपण आह्मांसी बोलले त्याप्रमाणें आपलाहि विचार कायम असावा. पुढें कर्तव्य अथवा न कर्तव्य जो विचार करणें तो आपल्या विचाराशिवाय होणार नाहीं, येविशींची खातरजमा असावी. वरकड देशी कित्येक २उभयतांत विरुद्धभाव एकितो त्यास तुम्हीं तेथें असतां ऐशा गोष्टी नसाव्या. कारण की घरकलह कामाचा नाही. दौलतीस अपाय होतो. बरें आम्हीं येथील गुंता उरकून श्रीचे दर्शनाकरितां येतच असों. आल्यानंतर तुमची आमची भेट होऊन पुढील कर्तव्य ते केलें जाईल. वरकर कितेक राजश्री बाळाजीपंताचें पत्रावरून कळेल. रा।।० छ १ रबिलाखर *बहुत काय लिया हे विनंती
पे।। छ १४ रबिलाखर भाद्रपद समान