Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ४७.
स. १७६७ ता. १४ आक्टोबर. श्री. १६८९ अश्विन वद्य ७.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबाचे सेवेशी
विनंती सेवक माहादजी शिंदे दंडवत विज्ञापना तागायत छ २० जमादिलावल पावेतों साहेबाचे कृपे-करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष छ ५ जमादिलावलचें आज्ञापत्र सादर जाहलें त्या पत्रांत आज्ञा कीं ‘तुह्मांकडील निष्ठेचा मजकूर राजश्री चिंतो विठ्ठल यांनी निवेदन केला. त्याजवरून तुह्मीं खातरजमा राखून हुजूर येणें, सरदारीचा बंदोबस्त करून पुढें हिंदुस्तानांत उपयोग पडिला पाहिजे. याजकरितां जरूर पत्रदर्शनीं स्वार होऊन यावें येविशीं चिंतो विठ्ठल यांनीं लिहिलें आहे’ म्हणोन पत्रांत आज्ञा त्यांस हुजूरजी आज्ञा-पत्र आल्यानंतर यावयासी दिक्कत नाहीं. आज्ञेप्रों दक्षणेस प्रस्थान केलें. एथील बंदोबस्त करून मजल दरमजल सेवेशीं एतच आहों. पुढें खावंद आज्ञा करतील त्याजप्रों वर्तणूक करूं. आह्मांविशीं राजश्री चिंतो विठ्ठल पेशजी साहेबाशीं बोलले आहेत व हालींही बोलतील. त्यास तें बोलणें आमचे आहे. दुसरा प्रकार नाहीं. वरकड कितेक बोलत असतील ते ध्यानांत न आणावें, मशारनिले बोलतील त्याजप्रों जो बंदोबस्त करणे तो करावा. आम्हींही मजल दरमजल येवून पोहचतच आहों. खावंदाची भेट होऊन दर्शनाचा लाभ घडेल तो सुदिन असे. उत्तरेस जावयाकरितां विजयादशमीस डेरे दिल्हे होते; परंतु आज्ञापत्र हुजूर यावयाशीं आलें, याजकरितां दक्षणेस डेरे दिल्हें. मजल दरमजल लौकरच *येतो. एथील प्रकार स्वामीचे लक्षा विरहित नाहीं. एथील प्रकार तो लोकांचें देणें बहुत व सेरसाल घेऊन परिना(म) लागत नाहीं. पांच चार लाख रुपये घेऊन निर्गम करून सेवेसी सत्वर येतों. दुसरे, स्वामीनीं आज्ञापत्रांत कितेक बंदोबस्त करावयाची आज्ञा केली तर सेवेशी येतों. सेवेशीं श्रुत होय हे विज्ञापना.