Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १५०.
१७६१ ता. २ फेब्रुवारी श्री. नकल १६८२ पौष वद्य १३.
राजश्री कृष्णराव बापूजी व भिवराव बापूजी उपनाम रामडोहकर, गोत्र विश्वामित्र सूत्र आश्वलायन, कुलकरणी कसबे मजकूर गोसावी यांसिः--
सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार सुहुर सन ईहिदे सीतेन मया -अलफ. तुम्हीं हुजूर के।। पुणें येथील मुक्कामीं विनंति केली कीं, आपणांस मोगलाईतून अलमगीर सानी बादषाहा याणीं कसबे रामडोह पो गांडापूर सरकार दौलताबाद सुभे खुजस्ते-बुनियाद हा गाँव दरोबस्त इनाम करार देऊन बादषाही फरमान करून दिल्दा. त्याप्रमाणें आपणांकडे भोगवटा चालत आला व सरकारतर्फेने सरदेशमुखी व बाबतीहि आपणांकडे चालतात. त्यांस आपण स्वामीच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक. यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अम्मल व सरकारांत आला, याजकरितां पेशजीचा बादषाही फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अम्मल व सरदेशमुखी व बाबती पेशजी आपणांकडे चालत आहे त्याप्रमाणें दरोबस्त इनाम करार करून देऊन भोगवटियासि सनद करून दिली पाहिजे १म्हणून. त्याजवरून मनास आणतां तुम्हीं राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक; तुमचें चालवणें आवश्यक जाणून तुम्हांवर कृपाळू होऊन तुम्ही बादशाही फर्मान आणून दाखविला तो पाहून को मजकूर हा गांव हक्कदार व इनामदार व मुकासी खेरीज करून बाकी मोगलाई अम्मल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहेत त्याप्रमाणें देखील जलतरुपाषाणनिधिनिक्षेपादि दरोबस्त इनाम करार करून देऊन हे सनद करून दिल्ही असे. तरी सदरहूप्रमाणें कसबे मजकूरचा दरोबस्त अम्मल तुम्हीं आपले दुमाला करून घेऊन तुम्हीं व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम अनुभवून सुखरूप राहणें. जाणिजे छ २५ जमादिलाखर, आज्ञाप्रमाण. मोर्तब.