Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक १४९.
१७६१ ता. २ फेब्रुवारी श्री. नकल १६८२ पौष वद्य १३
राजश्री देशाधिकारी व लेखकं वर्तमान भावी पा। गांडापूर गोसावी यांसिः--
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार व आसीर्वाद. सु।। इहीदे सीतैन मया व अलफ. कृष्णराव बापूजी व भिवराव बापूजी उपनाम रामडोहकर, गोत्र विश्वामित्र सूत्र आश्वलायन, कुलकर्णी कसबे मजकूर, यांनीं हुजूर कसबे पुणें येथील मुकामीं विनंति केली कीं, आपणास मोंगलाईतून बादशाहा अलमगीर सानी यांणी कसबे मजकूर हा गांव दरोबस्त इनाम करार करून देऊन फर्मान करून दिल्हा. त्याप्रमाणें आपणाकडे भोगवटा चालत आला व सरकार तर्फेने सरदेशमुखी व बाबती हि पेशजी इनाम दिल्याप्रमाणें चालतात. त्यास आपण स्वामींच्या राज्यांतील पुरातन येकनिष्ठ सेवक; यास्तव स्वामींनीं कृपाळू होऊन कसबे मजकूरचा मोगलाई अमल सरकारांत आला, याजरितां बादशाई फर्मान आपणाजवळ आहे तो पाहून मोगलाई अमल व सरदेशमुखी व बापती पेशजी आपणाकडे चालत आहे त्याप्रमाणें दरोबस्त इनामकरार करून देऊन भोगवटियास सनद करून दिल्ही पाहिजे १म्हणून. त्याजवरून मनास आणितां हे राज्यांतील पुरातन येकनिष्ठ सेवक, याचे चालवणें अवशक जाणून याजवर कृपाळू होऊन बादशाही फर्मान आणून दाखविला, तो पाहून कसबे मजकूर हा गांव हकदार व ईनामदार मोकासी खेरीज करून बाकी मोगलाई अमल व सरदेशमुखी व बाबती पेशजी चालत आहे त्याप्रमाणें देखील जल-तरु-पाशाण-निधीनिक्षेपादि दरोबस्त इनाम करार करून देऊन हें पत्र सादर केले असे. तरी सदरहूप्रमाणें कसबे मजकूरचा दरोबस्त अमल मशारनिलेच्या दुमाला करून यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम चालवणें. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची प्रत लेहून घेऊन असल पत्र मारनिलेजवळ भोगवटियास परतोन देणें. जाणिजे छ २५ जमादिलाखर. आज्ञाप्रमाण. मोर्तब असें.