Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
सनदा.
पत्रांक १४७.
१६४१ आषाढ शुद्ध ५. श्री.
नकल
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४६ विकारी संवछेर आषाढ श्रु।। ५ पंचमी गुरुवासरे क्षत्रिय-कुळावंतंस श्रीराजाशाहू छत्रपति स्वामी यानीं तपोनिधी वल्लभगीर गोसावी यांसि।
दिल्हें इनाम-पत्र ऐसाजे तुम्हीं हरिभक्तपरायण तपोनिधी. तुमचे मठीं अतीत अभ्यागत येत असतात. त्यांस अन्न-पाणीं पावल्यानें स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण; ऐसें जाणोन स्वामी तुम्हांवर कृपालू होऊन मौजे आंबवली ता। मुठें-खारें प्रों। मावळ हा गांव पेशजीच्या मोकासीयाजकडून दूर करून कुलबाब कुलकानु खेरीज इनामदार व हक्कदार चतुःसीमा-पूर्वक करून दिल्ही असे. तरी मौजे मजकूर आपले दुमाला करून घेऊन तुम्हीं व तुमचे शिष्य-परंपरेनें इनाम अनभवून सुखरूप राहाणें. जाणिजे. लेखनालंकार मोर्तब.
वारसुरू वारसुरूसूद बारसुमंत बारमंत्री.