Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२३.
१७०१ श्रावण शुद्ध ८.
(श्रीमत् रघुनाथराव.)
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. चिमणाजी गोपाल याजकडे पणवेलीपैकीं साडेचारशें रुपये सिल्लक आहे, ते पेशजी लक्ष्मण रणसोड याजकडे देण्याविषयीं पत्रें त्यास सादर जाहालींच आहेत. त्याजवरून मशारनिलेनीं लक्ष्मण रणसोड याच्या हवालीं ऐवज केला असल्यास उत्तम. नाहीं तरी तुह्मीं त्याजकडून ऐवज मागोन घेणें. दिक्कत करूं लागल्यास जनराल यास पत्र दिल्हें आहे. हें त्यांस देऊन त्यांजकडून निक्षूण ताकीद करवून ऐवज आपले पदरीं घेणें. ऐवज दिक्कत न करतां दिल्यास जनराल यास पत्र द्यावयाचें प्रयोजन नाहीं. कलम १
तुह्मांकडे बेलापूर वगैरे माहालचा ऐवज जमा करविला होता. त्यास, कोणे महालचा काय ऐवज तुम्हांकडे जमा काय जाहला आहे व त्यांतून खर्च काय जाहला आहे, त्याचा झाडा तपसीलवार हजूर लिहून पाठवणें. दाहां हजारपर्यंत तुह्माजवळ शिल्लक असल्यास आपलेजवळ ठेवणें. दाहा हजारावर असतील ते हजूर पाठवून देणें. कलम १.
एकूण कलमें दोन लिहिलीं असेत. त्याप्रों।। करणें. जाणिजे. छ ६ साबान. आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पौ।। छ १८ साबान, सन समानीन श्रावण व॥ ४.