Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री. 

लेखांक २२१.


१७०१ अधिक श्रावण शुद्ध ६.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समानीन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. आज्ञापत्र सादर जाहाल्यावरून बाळाजी विश्वनाथ याचे जिनसाची मोजदाद दिली. माझा बारभाईकडे जावयाचा मजकूर नसतां कोणी गैरवाका समजाविला आहे, हे नकळे, ह्मणोन तुह्मीं कितेक आपले निष्ठेचे अर्थ लिहिले ते कळले. व भास्कर भिमाजी याणेंहि विदित केलें. ऐशास, तुह्मांवर सरकारची बेमर्जी होऊन तुमच्या जागा दुसरा कारकून पाठविला, असा कांहीं अर्थ नाहीं. तुह्मी पुण्यास जाणार, हे बातमी दोन तीन जागांहून हुजूर कळली. तेव्हां तेथें देखरेखीस कारकून तरी असावा, सबब बाळाजी विश्वनाथ रवाना केला. मागाहून तुमचींही पत्रें आलीं. तुम्ही येकनिष्ठ, हे तुम्हांविषयीं खातरजमा दिसोन आली. त्यास, तुम्हांवर सरकारची कृपाच समजणें. तुह्मीं पहिल्याप्रमाणेंच तेथील कामकाज करीत जाणें. बाळाजी विश्वनाथ याजकडे मोजदाद जिनसांची दिल्ही असेल ते फिरोन माघारी घेणें. येविषयीं त्यासही ताकीदपत्र पाठविलें आहे. तो हुजूर येईल. जाणिजे. छ ५ रजब. आज्ञाप्रमाण. पो।। छ १४ साबान, सन समानीन, श्रावण शु॥ १४.

(लेखनावधि:)