Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २२०.
१७०१ वैशाख वद्य ४.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. तुम्ही चिरंजीवांकडे पुण्यास जाणार ह्मणोन ऐकलें. सबब, तेथें रहावयास हुजुरून बाळाजी विश्वनाथ कारकून पाठविले आहेत. तरी तुमचे तसलमातीस ऐवज आहे, त्या पैकीं नेमणुकीब॥ खर्च जाहाला त्याचा हिसेब यास दाखवून बाकी शिलक राहिला असेल तो ऐवज बाळाजी विश्वनाथ याचे स्वाधीन करून कबज घेणें. व तेथें सरकारचा जिनसाना आहे त्याची मोजदाद यांस देऊन पावती घेणें. सरकारचा वाडा व बंगला व बाग व विहिरी तेथें आहेत त्यांची देखरेख तुम्ही करीत होता त्याप्रमाणें तुम्हीं खर्चाचे नेमणुकीची याद तुह्माजवळ असेल ती मशारनिलेचे स्वाधीन करणें. जाणिजे. छ १७ रबिलाखर.
आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पो।। छ ५ जमादिलावर.
सन समानीन.