लेखांक २८.
श्री.
१६६५ अधिक आषाढ वद्य ३०. राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पा जुन्नर गोसावी यांसी-

छ अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य रो बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सु|| अर्बा सलासैन मया व अलफ. मौजे केळगाव, ता. चाकण, पा मजकूर हा गांऊ बाबतीचा मोकासा श्रीपांडुरंग परमहौंस वास्तव्य क्षेत्र आळंदी यांस दिल्हा आहे. तरी तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून मौजेमजकुरचा बाबतीचा आकार होईल तो ऐवज श्रीस्वामी यांजकडे साल दरसाल सुरळीत पावे ते करणे. प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे. जाणिजे. छ २८ मोहरम  * आज्ञाप्रमाण. (लेखनसीमा)

लेखांक २९
श्री.
श्री. राजा शाहू नरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ प्रधान.

१६५५ अधिक आषाढ वद्य ३० म|| अनाम गुमास्ते सरदेशमुख व देशमुख देशपांडे प|| चाकण यांसी बाजीराव बल्लाळ प्रधान. सु|| अर्वा सलासीन मया व अलफ. मौजे केळगांव परगणेमजकूर हा गांवबाबतीचा मोकासा श्रीपांडुरंगाश्रम परमहौंस वास्तव क्षेत्र आळंदी यांस दिल्हा आहे. तरी तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून परमहंसस्वामी यांजकडे रुजू राहून आकारप्रमाणे मौजेमजकूरचे बाबतीचा ऐवज वसूल सुरळीत देत ते करणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. सालदरसाल बाबतीचा ऐवज मौजेमजकूरचा स्वामीकडे पावीत जाणे. जाणिजे. छ. २८ मोहरम. आज्ञाप्रमाण.
(लेखनसीमा)