लेखांक २३.
श्री.
१६८१ कार्तिक वद्य १. कर्जरोखा शके १६८१ प्रमाथीनाम संवत्सरे कार्तिक वद्य प्रतिपदा ते दिनी खत लिखिते धनकोनाम रामचंद्र बापूजी मोघे यांसी रिणकोनाम रामचंद्र कृष्णराव जोशी आत्मकार्य-प्रवर्त-संबंधे घेतले कर्ज मुद्दल रुपये ७००० सात हजार यासी व्याज दरमाहे दरसे|| रु||आठ आणे बिनसूट देत जाऊ. हे खत लिहिले. सही ह|| केसो बल्लाळ देव.
साक्ष.
चिंतामणराव नारायण पाटणकर.
लेखनसीमा.


लेखांक २४
श्री.
शके १७०२ गंगाभागीर्थी समान रखमाबाई यासी-

प्रति रामशास्त्री आशीर्वाद उपरी. आपला व राजश्री मेघःश्यामपंत यांचा विभागाचा व दत्तकविषईचा कजिया आहे, त्याचा इनसाफ करावयाविसी श्रीमंतांची आज्ञा जाली. त्यावरून आपणाकडील कारकून केसो बल्लाळ येथे होते त्यांस येविसीची हकीकत लेहून द्यावयाविसी व जामिनाविसी सांगितले. त्याप्रो दत्तकाची हकीकत त्यांणी लेहून दिल्ही. पुढे विभागाची लेहून द्यावी व जामीन द्यावा तो न देतां, निघोन गेले. त्याजकरिता आपणास लि आहे. तरी येविसींच्या जाबसालास माहीत कारकून असतील त्यास मनसुफी विल्हेस लागतो नेहमी येथे पाठवावे. उभयतांचे द्वैत मनास आणून वाजवीचे अन्वये विल्हेस लावावे लागते. तरी कारकून माहीत शहाणा पाठवावा. * बहुत काय लिहिणेॽ हे आशीर्वाद.