Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४२.
श्री
१६८८ भाद्रपद शुद्ध ६
शिका नक्कल.
नल, इ मा अनाम देशमुख व देशपांडे, प्रो पडदूर, सरकार जालनापूर, यांसीः-
माधवराव बल्लाळ प्रधान, सुा सबा सितैन मया व अलफ. प्रो मजकूर येथील देहे,
१ मौजे सुगाणे १ मौजे तरवडे १ मौजे वरफळ
१ मौजे लिखितदरी १ मौजे वैजोडें १ मौजे लिगसे
१ मौजे पाकणी शरामत १ मौजे टाकळी १ मौजे शिराळे
१ मौजे गेवराई १ मौजे डोलार १ मौजे कर्जखेडे
१ मौजे गुळखेडे १ मौजे सृष्टी १ मौजे देवळे
९ मौजे कोटाची सळई १ मौजे खडेले १ मौजे कोळोलदेवरुख
१ मौजे वडसी १ मौजे खांडरी १ मौजे मंगरुळ
१ मौजे आगलगांव १ मौजे म्हसले १ मौजे चाकी
१ मौजे रायपूर १ मौजे पांडोरे १ मौजे केदारवाडी
१ मौजे बावई १ मौजे थरीठाणे १ मौजे ठाणे
१ मौजे देरनाबाद १ पिंपळखेडें
येकूण ३२ गांव मुकासा व बाबती व सरदेशमुखी व इनामगांव व जमिनी खेरीज करून जहागिरीचा अंमल नरसिंगराव जनार्दन धायगुडे यांजकडे फौजेचे सरंजामास सालमजकूरपासून करार करून दिला असे. तरी सदरहू ३२ गांवचा जहागिरीचा अंमल मशारनिल्हेशीं रुजू होऊन सुरळीत देणें जाणिजे. या छ. ५ रबिलाखर आज्ञा प्रमाण.