Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४९०
श्री. १७२१
यादीः शेषाद्री सिंहराज याजकडे नवाब निजाम अल्लीखान बाहादूर यांचे सरकारांतून इनामी गांव वंशपरंपरेनें अनुभव करावा म्हणोन सनद जाली आहे व जातीस जागीर आहे. त्यांस घांसदाणा श्रीमंत राजश्री सेनासाहेबसुभा त्यांजकडील आहे. तो सेनासाहेबसुभा यांणी माफ करून, इनामी गांवचा इनाम वंशपरंपरेनें करून देविला पाहिजे व जातीस जागीर आहे तेथील मा।रनिलेचे जातीचे इनामी सनदा व जातीचे जागीरीच्या अलाहिदा सनदा व्हाव्या. सु।। मयातैन व अल्लफ. गांव तपशील:-
२ इनामी गांव पो पालीक उर्फ बेरनवट सरकार नांदेडपैकीं
१ मौजे फरकंडे
१ मौजे निंबेवाडी
------
२
५ जातीस जागीर देहेसुमार
४ पो च्यार ठाणे सरकारपैकीं.
१ मौजे देगांव.
१ मौजे बेरुळें.
१ मौजे सोनवटी.
१ मौजे पांढरगळें.
-----
४
१ मौजे नांदेडखोड, पो लोहगांव, सरकार पाथरी.
---- ------
७ ५
याचा तनखा रु।।
२०२५ इनामी गांव दोन.
१४५० मौजे फरकंडे.
५७५ मौजे निंबेवाडी.
------
२०२५
४४०० खासगत जागीर.
३००० पो चार ठाणें पौ दोहे चार याचा तनखा एकंदर
१४०० मौजे नांदखेड पो लोहगांव सरकार पाथरी देहे १
-------- ----------
६४२५ ४४००
याजविषयीं सनदा व पत्रें सुमार.
५ इनामी गांवच्या इनाम वंशपरंपरेनें म्हणोन.
१ शेषाद्री सिंहराज याचे नांवें.
१ जमीदाराचे नांवें.
१ कमावीसदार घांसदाणीयांचे नांवें वर्तमान भावी पत्र द्यावें जे, पा। पालीम व लोहगांव येथील घांसदाणीयाचा आद आहे त्या पो दोन गांवचा घांसदाणीयाचा ऐवज सरकारांतून मारनिलेस इनाम करून दिल्हा आहे. त्यास, पा। मारचे चुकोती. पैकी मजरा देऊन, बाकी ऐवज घ्यावा.
२ मुकदमाचे नांवें.
-----
५
२ जागीरीचे गांवाविषयी मा।रनिल्हेचे जातीस सरकारचा घांसदाणा माफ केला असे, म्हणून सदरहू अन्वयें पत्रः
------
७
१ शेषाद्री सिंहराज याचें नावें.
१ वर्तमान भावी कमावीसदार यांचे नांवें.
-----
२
एकूण सात पत्रें श्रीमंतास विनंती करोन सालमजकुरी उपद्रव व ऐवज न देणें पडे, ऐसें व्हावें.