Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८७
श्री १७२१ आश्विन शुद्ध ७
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नारायण दीक्षित स्वामीच सेवेसी:--
विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुम्हांकरितां विजयादशमीच पोशाख.
सनगे सुमार.
३॥. तुम्हास
१ तिवट पैठणी.
१ जाफरखानी.
१ महमुदी.
.।।. किमखाप.
------
३॥.
३॥. यज्ञेश्वर दीक्षित यांस.
१ तिवट पैठणी.
१ जाफरखानी.
१ महमुदी.
.॥. किमखाप.
३॥.
----
७
येकूण सात सनगें पाठविली आहेत. घेऊन पावालयाचें उत्तर पाठवणें. जाणिजे. छ ५ जमादिलावल, सु।। मयातैनवअलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.