Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४८९
श्रीगणेशायनमः १७२१ फाल्गुन शुद्ध १३
श्रीकुलदेवतायैनमः श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यैनमः श्री जुगादैत्यैनमः श्रीसिद्धेश्वर व श्री विपलेश्वर व श्रीधूतपापेश्वर स्वामीचे सेवेसीः-
चरणरज सिद्धेश्वर महिपतराव चींचलकर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना तागाईत माघ बहुल सप्तमीपर्यंत स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असों, विशेष. विनंति ऐसिजेः-खासगत लग्नाचा निश्चय फाल्गुन शुद्ध त्रयोदशी सोमवारीं करून शरीरसंमंध वेदशास्त्रसंपन्न राजश्री सिद्धेश्वर दीक्षित ठकार यांसी केला आहे. औशास, आपण सर्व कुलस्वामी व अध्ययांनी येऊन न्यून असेल तें पूर्ण करून कार्यसिद्धी केली पाहिजे. सर्व अभिमान आमच्या स्वामीस आहे. कळावें बहुत काय लिहावें ? सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.