Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०६
श्री लक्षुमीकांत प्रसन्न. १७१८ आश्विन शुद्ध ९
श्रीमण महादेव आलमेल मगापति श्री त्रिमलनाथ व्यंकटेशं त्रिभुवनपति आनंतकटिब्रह्मांडनायेक कल्पवृक्षं चिंतामण स्वामी दयानिधि परिपूर्ण सागर परजोतिप्रकाशगहना श्रीवछेलांछेन श्रीत्रिमलनारायेण भुवनवेकुंठपति निराकार त्रिलोकनाथ माहास्थळ शेशाचळपरवंत राजेलोक व्यंकटनायेक श्रीमाहाराज व्यंकटेश चिरंजीव भक्तं राजा शाहूछेत्रपति माहाराज व श्रीमंत पेशवे मुखे प्रधान व अष्टप्रधान व राजेउमराव व कमाविसदार यांसि समस्त पारपत्यकार रघुनाथ आचार्य मुद्राधिकारी फैजदार मुकाम तीरपति सरकार चंद्रगिरी देसी आसनपति देवद्वारी संनिध बसून आज्ञापत्र आसीरवाद. उपरि ल्ह्यावया कारण आसीजे. गोविंदआया देशमुख पराडकर याणीं हजुरगिरीस येऊन वर्तमाण विदित केलें कीं, समुद्रीपरियेत त्रिमलि याजकडे घरजमेचा यैवज थकला. वसूल होत नाहीं. त्याजवरून आज्ञापत्र रवाना केलें आहे. तर सरकारचे सिपाई देऊन, ताकीदपत्र देऊन, जेथवर त्रिमली असतील त्यास निक्षून ताकीद करून यैवज घरजमेचा गिरीस दाखल होये ते करावें. याचा फिरून बोभाट न ये तो आर्थ करावा. स्वामीची आज्ञा आहे. चिरंजीवास माझे मान्य करून स्वामीचे कार्यास ततपर असावें ह्मणजे चिंतले मनकामना पूर्ण होईल हा स्वामीचा पूर्ण भरवसा धरावा. तुह्मास प्रसाद गंध मनोहार पाठविला आहे. सेरी वंदून घेणें हा आसीरवाद. मिती सके १७१८ जळनाम संवतसरे आस्वीन शुद्ध ९ नवमी.