Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४०३
श्री. १७१८ आषाढ वद्य १४
राजश्री नारायेणराव वैद्य गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री व्यंकटशास्त्री द्रवीड रामानुज बाह्मण, थोर, सत्पात्र व दक्षणी गायनकळेविसीं निपुण, त्याणीं विनंती केली. याचे विनंतीवरून व राजश्री सदाशिव बापूजी यांचे लिहिल्यावरून, सविस्तर समजण्यांत आलें. त्यास, शास्त्री मशारनिले दक्षिणीगायनकलेंत वित्पन्न व ब्राह्मणहि थोर सृत्पात्र आहेत हें समजोन, इकडेस येण्याविसीं तेथें तुह्मीं व सदाशीव बापूनीं त्यांसीं बोललाच आहां. त्यापक्षीं त्यांणीं सरकारांत येण्याचें करावें. येविसींचे मजकुराची आज्ञी जी करणें ती तुह्मांकडील राजश्री राघो धोंडदेव यांसी केली आहे. लिहितील. व राजश्री सदाशिव बापूजी यांसी लिहिलें आहे. बोलतील, त्यावरून कळेल, व शास्त्री मशारनिल्हेचेहि नांवें पत्र सरकारांतून लेहून पाठविलें आहे. रा। छ २७ माहे मोहरम, बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.