Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३७८
श्री
यादी राजश्री शिवाजीराव सुर्वे मोकाशी मौजे कुसगांव ता। पोनमावळ हा गांव सरकारांतून नानाजीराव सुर्वे आपले तीर्थरूप यांणीं सिद्दी सातावर वार केले सबब सत्तावीस जखमा आंगावर लागल्या, ह्मणोन बहुमान करून सदरहू गांव दिला. चुलता आत्माजीराव आपल्या तीर्थरूपाबरोबर चाकरीस होता. भाऊपण्याचा वेठाळेपणा सर्व ठीकच जाहला आहे. चाकरी मात्र एक जागां करीत होते. त्याजवर भाऊसाहेबांबरोबर हिंदुस्थानांत आपण व आपले चुलत भाऊ खंडोजी सुर्वे बिन भिंवजीराव सुर्वे गेलों होतों. तेथें सर्व घोडीं पिढीं जाऊन परतोन माघारें आलों. पुण्यांत कर्ज बहुत जाहलें. ते समई खंडोजी सुर्वे यांणीं आमचें व आपलें नांव घालून कुसगांवासी सनद सरकारांतून घेतली आण आपले घरास गेले. त्यापासून आज वीस बावीस वर्षे खंडोजीचें कोणी हुजूर चाकरीस आलें नाहीं. आपण सरकारची चाकरी करीत आलों दरम्यान धोडपेच्या सालीं निरोप घेऊन घरीं गेलों. मग धोडपेस स्वारी सरकारची जाली. ते समई आपणास चाकरीस बोलावणें गेले. नंतर आलों. तों स्वारी होऊन पुण्यास श्रीमंत आले. आह्मीं हुजूर पागेकडे निसबतीस होतों. त्यास, सदरहू चाकरीस चुकलों हें निमित्य ठेऊन गंगाधर पंत हुजूर पागेकडील याणीं गांव जप्त केला. त्याजवर गांव सोडवावयास सरकारांत नजर रुपये १३०० व दरबारखर्च ३०० एकूण सोळाशें रु।। पडिले. नंतर आणि एकवेळ चाकरीस यावयास चार रोज अधिक लागले ह्मणून मागतीस गांव जप्त करून रु।। ६०० घेतले. एकूण बेवीशें रुपये आपणास पडिले तें व्याजसुद्धां तीन हजार सावकाराचे जाहाले, तेव्हां व्याज भारी सबब कैलासवासी नारायणरावसाहेब यांचे कानावर मजकूर घालून, राजश्री महिपतराव कृष्ण यांजकडून तीन हजार रुपये एकत्रो व्याज घेऊन, सावकारास देऊन, गांव मा।रनिलेकडेस ठेविला. हाल्लीं इंग्रजांच्या दंग्यामुळें वगैरे, कोळ्यांच्या दंग्यामुळें व तोतयाच्या दंग्यामुळें गांव. दोनतीन वेळां वोस पडिला. मागती लावणी करून चाकरी सरकारची नेहमीं करीत आलों असतां हाल्लीं नारायणजी सुर्वे खंडोजी सुर्वे यांचे पुतण्ये, येऊन कजिया करितात. हाल्लीं ठकारदिक्षितांची भीड घालून गांवची सनद करून घेतली आहे. त्यास सनद माघारी घेऊन, साहेबीं वाजवी इनसाफ मनास आणून, कर्तव्य तें करावें. बेवीस वर्षे चाकरी सेवा कोणी केलीं? चाकरीची गांवबलांडे सोसले. रोजमुराहि आज दहावर्षे सुरळींत पाबत नाहीं. ऐसें असोन साहेबीं निमे गांवची सनद नारायणजीस दिल्ही! याची चौकशी जाली पाहिजे. शेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.