Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३७७ श्री

राजश्री रामचंद्र माहादेव गोसावी यांसः--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने। तुकोजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित आसिलें पाहिजे. विशेष. कसबें कडुस ता खेड येथील धर्माजी व काळोजी पोटे धणगर यांणीं विदित केलें कीं कसबे मजकुरीं आमचे मिरासी सेत नवखंडी जमीन आहे. त्यापौ कांहीं आह्मीं वाहतों व कांहीं पडित होती ते गांवकरीयांनीं दुस-यास लाविली, प्रस्तुत, जमीन आमचे आम्हीं मागत असतां द्यावयासीं गांवकरी दिकत करितात. येविशीं त्यांस ताकीद जाली पा।जे. ऐशियाशी, कसबे मजकुरीं आपल्याकडील कमावीसदार असेल त्यास पत्र देऊन याचा करीणा मनास आणून पोटे मजकूर याची जमीन ज्याकडे गेली असेल तो द्यावयासीं दिक्कत करीत असला तर त्यास ताकीद करून, वाजबी याचें मिरासी सेंत जें असेल तें झाडून यांचें यांजकडे देवावें. येविषयीं लढा * पुन्हां न राहे तें करावें. रा। छ २४. मोहरम. बहुत काय
लिहिणें ? हे विनंति, मोर्तबसुद.