मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३४४

श्री १७१० मार्गशीर्ष वद्य १४


छ मा। अनाम देशमुखदेशपांडे मामले बीड यांसीः-


माधवराव नारायण प्रधान सु।। तिसा समानीन मया व अलफ. मामलेमार पो दिगर जाहागिरीचे गांव राक्षसभुवन वगैरे येथील अमल महिपतराव विश्वनाथ यांजकडेस जातीस व पागापथकाचे बेगमीस सरंमजाम चालत होता. त्यास ते मृत्य पावले, सबब त्यांचे पुत्र राजश्री सिद्धेश्वर महिपतराव यांजकडे जातीस व पागा पथकाचे बेगमीस सरंजाम सालमजकुरापासून करार करून दिल्हा असे. तरी, मा।रनिलेशीं रुजू होऊन, अमल सुदामत प्रों सुरळीत देणें. जाणिजे, छ २७ रबिलावल. आज्ञा प्रमाण, लेखनसीमा.



Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries