मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ३४३

श्री. १७१० मार्गशीर्ष शुद्ध १


अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांसी:-


सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुहुरसन तिसा समानीन मया व अलफ. तुह्मीं पत्र छ ६ सफरचें पाठविलें तें छ २७ मिनहूस प्रविष्ट जाइलें. लिहिला मजकूर सविस्तर अवगत जाहला. श्री नरहरीसानिध्यें करून शरीरप्रकृत चांगली आहे, ह्मणून लिहिलें. उत्तम आहे. रा। छ २९ सफर. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries