Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३३० श्री
रु
पो छ ५ सफर तीसैन, १७११ आश्विन वद्य ५
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक त्र्यंबकराव येशवंत कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता। छ १९ माहे मोहरम मुक्काम किले नरगुंद स्वामीचे कृपावलोकनें सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. तालुके–मजकुरीं येथील दुसालची वहिवाट तयार करविली आहे. दिपवाळीच्या सुमांरे कारकुनाची रवानगी करून सेवेसी पाठवितों. दक्षिणेकडील बातमीचे वृत्त तरीः खुद्द टिपू कोईमतुरानजीक जमाव सुद्धां आहे. अद्याप तह नाहीं. या तोंडीं फौज नवती. याकरिता मुरार्जी नलगे व गंगाजी सांवत वगैरे फूट सरदार पांच हजार फौज व पांच हजार बार येणेप्रों तुंगभद्रा उतरोन करजगीवर मुकाम करून राहिले आहेत. लस्करांत माणसे बातमीस पाठविलीं आहेत. मतलब काय आहे, याचे ठिकाण लाऊन मागाहून सेवेसी विनंति लिहितों. सेवेसी विदित होय हे विज्ञापना.