Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २९१

श्री १७०२ पौष शुद्ध ९


बक्षिसनामा शके १७०८ पराभवनाम संवत्सरे पौष शु।। ९ नवमी शुक्रवार ते दिवशी राजश्री बाळाजी जनार्दन, उपनाम भानू , गोत्र काश्यप, सूत्र आश्वलायन, महाजन, मौजे वेळास, ता। वेसवी, सुभा दाभोळ, यांसी न्याहालकुवरबाई, कुचमानसिंग जाधवराव व राव जगदेव उर्फ राजे आनंदराव बिन जाधवराव, देशमुख व देशपांडे सरकार दौलताबाद, वगैरे सुभे खुजस्तेबुनियाद. सु।। सबा समानीन मया व अलफ, सन ११९६ फसलीं. कारणें बक्षिसनामा लिहून दिल्हा ऐसा जेः सन ११८९ चे सालांत राजे मानसिंग जाधवराव देशमुख देशपांड्ये कैलासवासी जाहाले. सबब व नवाबबंदगानअल्ली यांणी माहालानिहायचे वतनाची जप्ती केली. ते सोडून बेवारसे पदरीं सनदा करून घ्याव्या म्हणोन आम्हीं हैदराबादेस गेलों. सरकारचे मुत्सद्दी वगैरे यांचे वि।। जाबसाल लाविला. तों भाऊबिरादर मानसिंग जाधव वल्लद यशवंतराव जाधव हे वृत्तीसंबंधें वादास आले. आम्हांकडील विठ्ठल बयाजी दिवाण माहितगार पुरातन होते, त्यांचा काळ जाहाला. सर्व प्रकारें गोष्ट विलग पडिली. वतनाचे खटपटीस माहितगार जाबसालीं माणून कोणी पदरीं नाहीं हें संकट जाणोन तुम्हांकडे पैगाम लाविला कीं, आपण श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचा राज्यकारभार सर्व चालवितां, नबाब बंदगानअल्ली यांस तुमचा स्नेह बहुत आहे, त्यांजपाशीं वकीलकीचे कामास राजश्री जिवाजी रधुनाथ आहेत, त्यांजली आम्हांविशीं लिहून त्यांजकडून हरएकविशीं आमचें साहित्य होय आणि वतनाच्या सनदा मोकळीविशीं आम्हांस प्राप्त होत, तें करावें. याप्रों आमचें बोलणें ऐकून, आमचे घरोब्यावर व थोरवर्तनाचें संरक्षण करावें यांत इहपर पुण्य पुरुषार्थ आहे हें जाणोन, आपण जिवाजीपंत यांस लिहून आमचे साहित्यास अनुकूल केलें. त्याजवरून जिवाजीपंत यांणीं नवाब बंदगानअल्ली यांचे दरबारीं साहित्य करून, पूर्ववतप्रों वतनाचे बहालीच्या सनदा आमचे नावें करून ठेविल्या. वतनाचा भोगवटा पूर्वीपासून आपले वडीलवडील करीत आले त्याप्रें।। आपणही अनुभऊं लागलों. गेलें वतन पुन्हां प्राप्त जालें हा लाभ आह्मीं चित्तांत आणून, आपला उपकार बहुत जाहला याचें उत्तीर्ण काय व्हावें याचा विचार करितां, शिवाय वतन द्यावयाजोगा अर्थ दिसत नाहीं हें जाणोन, पो वरूळ ऊर्फ राजपुर येथील देशमुखदेशपांड्येपणाची वृत्त पूर्वीपासून आपली आहे, त्यांपैकीं देशपांड्येपणाचें वतन पेशजीं जिवाजी रघुनाथ यांचे पुत्र खंडेराव व अमृतराव जिवाजी यांस देऊन देशमुखीची वृत्त आपणाकडे चालत होती ते आपणांस दिल्ही. यानें कांहीं उपकार फेडिलासा जाणोन, देशमुखीची वृत्त देहे एकतीस द्यावयाचा करार करून, हें बक्षीसपत्र तुह्मांस आत्मसंतोषें लिहून दिल्हें असे. तर सदर्दू एकतीस देहे येथील देशमखीचे वतन व वतनसंबंधें हक्क रुसूम वगैरे भोगवटा द्यावयाची कलमें बितपशील:-
१ हक्क रुसुम दर गांवास तनखे             १. भेटी दर गांवास दोन, तुम्हीं
यास दरसदे रु।। ३ द्यावयाचा                व तुम्हांकडील गुमास्ता प्रों मजकूरचे
शिरस्ता आहे त्यापौ देशपांडे रु।। १         कामकाजास ठेवाल त्यांणीं घेत
घेतील. बाकी रु।। २ तुम्हीं घेत जावे.        जावी. कलम.
१ सिरपाव सरकारांतून अगोदर              १. धनगरांचे माग ज्या गांवीं असेल
तुम्हीं घ्यावा, मागाहून देशपांडे घेतील.     त्या गांवीं दरसाल चवाळें एक
१ वतनी कागदावर वगैरे दसकत            घेत जावें.
तुम्ही आपले नावें करावें. तुमचे              १ चांभाराकडील जोडा दर गांवास
बाजूस देशपांडिये दसकत करितील.       वासदरसाल एक घेत जावा.
                                                      १ कसबे मजकुरीं सायरान हक्क
१ भेट तुम्हीं अगोदर हकीमापुढें             आहे तो घेत जावा.
ठेऊन, मग देशपांडे याणी ठेवावी.         १ शाहा दावलपिदर याचे मुजी-
१ विडा सरकारचा वगैरे अगो.               वरापासून दरसाल तबरुकाबाबत रु।।
दर तुम्ही घेऊन, मागाहून देशपांडे          ३ तीन घ्यावयाचा शिरस्ता आहे.
यांणी घ्यावा.                                       त्यांपैकीं देशपांडे यांचा रु।। १, बाकी
१. वरकड हरएक मानपान वतनसंबंधें     दोन तुम्हीं घेत जावे.
अगोदर तुम्ही, मागाहून देशपांडे             १. भाकरीबाबत ऐवज गांवगन्ना येईल
यांणी घेत जावे.                                   तो निमे देशपांडे यांस देऊन बाकी
१. देशमुखीचे वतनाबाबत वाडा               निम्मे तुम्ही घेत जावा.
कसबे मजकुरीं आहे, तेथें इमारत            १. कलावंत थेर भोरीप वगैरे यांस
बांधून नांदावें.                                     त्याग अगोदर तुम्हीं, मागाहून
१. कसबे मजकुरीं वगैरे हरएक                देशपांडे यांणीं द्यावा.
गांवीं बाजार भरेल तेथें शेर                    १. प्रों मा।रीं हरएक कामकाजमुळें
तुम्ही घेत जावी. प्राप्त होईल तें तिसरा हिस्सा
१. इनाम जमीन जिराईत, बागाईत,         देशपांडे यांस देऊन, दोन हिस्से तुम्हीं
पूर्वीची आहे ते                                    तुम्हीं घेत जावें.
अनुभवीत जावी.                                 १. परगणें संबंधें सरकारचें देणें
१. सणाची मोळी माहारांकडील             वगैरे पडेल तें तिसरा हिस्सा देशपांडे
दर गांवास घ्यावी.                               व दोन हिस्से तुम्हीं देत जावें.
१. संक्रांतीचे तीळ व पित्रांचें
तूप दर गांवास घेत जावे.
सदरहूप्रें।। कलमें करार करून दिल्हों आहेत. त्याप्रें।। व तुह्मीं आपले कारकिर्दीस नवीन संपादन कराल ते तुह्मी आपली मिरास मुस्तकीम जाणून तुह्मीं व तुमचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेनें भोगवटा घेत जावा. वतनास दुसरियाचा अधिकार नाहीं. कालक्रमें कोण्ही वारीसदार मुजाहीम जाला, तर आपण त्यासी वारूं. तुम्हांस तोशीस लागों देणार नाहीं. सदरहू कारास आमचे वंशांचा कोण्ही दिक्कहरकत करील त्यास कुळस्वामी व पूर्वजांची शपथ असे. हा बक्षिसनामा लिहून दिल्हा. सही.