Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २८९
( नकल ) १७०८ भाद्रपद वद्य १२
पौ छ ११ जिल्हेज सबा समानीन.
राव अजम अकरम लक्ष्मणराव रास्ते सलमलाहुताला.
सो मुषफक मेहेरबान कदरदां करमफर्माय माखलिसां बादज षौक मुलाकत मषहुद जमीर मुजीरत बेहुदतखमीर नमुदा मा आयद. येथील खुषी जाणोन आपली षादमानी हमेषा कलमी करीत आलें पाहिजे. दरींविला छ ७ जिल्कादचें खत अजराहे मेहेरबानगी पाठविलें तें पोंहचून खुषी हांसल जहाली. तुम्हीं उभयतां येथें होतां. येथील बोलण्याचा जातेसमई सर्व मजकूर रुबरु सांगितला होता. व तुम्हीं येथें असतां तुम्हांकडून वारंवार पत्रें लिहून पाठविलींच होतीं. तुम्हीं तेथें जाऊन पोंहचल्यानंतर उत्तम प्रकारें बोलून तहाचें पर्याय कांहींच न लिहिले. यावरून अपूर्व दिसून आलें. अमुक प्रकारचा तह करावयाचा म्हणून तपसील लिहून पाठवावा म्हणून लिहिले होतें. तर, आह्मीं तेथून येते समई पेशकसचा ऐवज व दरबारखर्चचा ऐवज सहित दिल्हे. या तरफैनची दोस्ती मजबूत होत आहे ह्मणून अण्णा सो सांगितला होता. त्याप्रमाणें आमचे खाविंद खुदावंदन्यामतांस जाहीर केला. त्यास, पेशकसीचा ऐवज देणें. सर्वाकडून तकरारच नाहीं. वाजबी जें देणेच असेल तें दिलें जाईल. दरबारखर्चाचे मजकूर लिखापढी नाहीं. मुनासीब देणेच असेल तें देऊं. या विरहीत तरफैनचे दोस्ती मजबूद जाहल्यावर, आणखी ज्यां ज्यांस मुनासीब जेथपर्यंत करणेंच तेथपर्यंत केला जाईल, ह्मणोन फरमाविलें. आपण दाणा व दूरंदेष आहेत. सहज कामाकरितां आपले खाविंद श्रीमंतांसीं करोडोचे पेंचांत न द्यावा आणि तफैंनचा खल कुळाच्या रफाईवर नजर देऊन मदारुलमहाम यांस ज्याप्रकारें बोलावें कीं त्याप्रमाणें बोलून तफैनचे दोस्ती मजबूत होत असें करून इतिल्ला द्यावा. तरफैनचे दोस्तीचे कामास सिवाय तफैनचे उमदा लोक दरम्याने आले. अगर दहा वर्षे ऐसेच कज्या खटपट असलियाही फैसल्ला पावणार नाहीं. साबक पंचवीस तीस वर्षा खालें कैलासवासी रघुनाथराव व माधवरावसाहेब असतांना, इकडून मातबर वकील खाननुरुल्ला व करीमखान गेले होते. त्यास, उभयतां रावसाहेबांनी ताजीमतवाजू देऊन मानपान केले होते. त्याजप्रों तिकडूनही आनंदराव निंबाजी येथें होते. त्यास, आज इ।। मुलाकत तारा।गीन्यावस्ती त्यांनीं हुजूरदरबारास आले. त्यावख्तीं ताजीम व अत्तरदान पानदामचामुदार होत होते. हे मजकूर आम्हीं आपणास जाहीर केला होता. बोललो. आतांहि आनंदराव निंबाजी हमराही लोक असतील ते आपणाला जाहीर केलेंच असतील. आम्हीं आलों असतां श्रीमंतांकडून मानपान जाहाले ते आपणास जाहीर आहे. श्रीमंतांचे व सरकारअसदुल्ला हीच दोस्ती मजबूत जाहाल्यावर हमेषा तिकडून उमदा लोक येथें यावा, येथील उमदा लोक तेथें यावा. त्यास, मानापानांत फरक आलिया कैसे येतील ? याकरितां तेथें मदारुलमहाम यांसीं वगैरे बोलून, येथून उमदा शखस आलिया श्रीमंतांकडू ताजीम देणेंचेंही मा।र ठराऊन लिया पाठविलिया, येथें आम्हीं हुजुरांत अर्ज करून येथून उमदा शखस पाठविला जाईल. आसाहेबांकडील खैरआफियतेचे खबर निगारष करीत आलें पाहिजे. रा। छ २५ जिल्काद. ज्यादा काय लि।।. हे किताबत. १७०८.