Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २९५.
१७०९
कडील नित्यानीं एकटें दुकटें होऊन भेटतात. आपली फौज जाऊन शामील जाली याजमुळें रामसिंगजीची बाजी सरशी दिसते, बिकानेरकरही अद्यापि भयपक्षीं येऊन शामील जाला नाहीं. राजश्री सवाईमाधोसिंगजी याचा व बख्तसिंगजीचा पूर्वीपासून स्नेहभाव होताच. व सांप्रतकाळींही त्यांजकडील कर्णीदान चारण येऊन ठाकुर पेमसिंगजीचे विद्यमाने मजबुती करून गेला होता. न कळे, कसा काय करार जाहला. एवंच टिका, हाथी, घोडे, वस्त्रें, जवाहीर त्यास पाठवून ऐक्यता जाणविली. कुसळसिंग झालाबेकर याजकडीलही राडा आजि पंधरा सोळा महिन्यांपासून पडून राहून, त्याचा पुत्र कुंवर जसवंतसिंगजी रुसुवा करून घरी जाऊन बसले होते. दिवाण हरि गोविंदजीना पुत्र व कन्हईराम दिवाण या उभयतांसी, त्याजला समजाऊन आणावयानिमित्य, पाठविलें असतां ते न आले. व राजी बसल्यानंतर देवशासीं जाऊन, एकदां वडील कोणी यांचे कुलांत सत्या जाहल्या जाहेत, त्यांचीही पूजा एकदां जाऊन करणें जरूर, ऐशा कित्तेक विचारानुरूप राजश्री सवाईमाधोसिंगजीनीं अजमीरचे रुखें डेरा उभा करविला. व मजसमागमें हठराम धमाई व रविदत्त जाट......रामजीचा पुत्र चिमणराम याजकडून झालावेस ठाकूर कुसळसिंगजी व कुंवर जसवंतसिंगजीस समजाऊन आणावया निमित्य पाठविलें. आजि पंधरा महिने जाले कीं नित्यांनीं येऊं येऊं करित होते. स्वामीचे पुण्यप्रतापेंकरून त्यासीं भाऊबंदसुद्धां तेथून स्वार करून आणिलें, तों सवाईजी डेरे दाखल जाले होते. उभयपक्षीं भेटीगोष्टी करून, त्यांची जागीरपट्टी जें कांहीं पावत होतें तें यथापूर्वक त्यांजवर बहाल करून देऊन, सन्मानपूर्वक सौख्य संपादून दिधलें. पाहतां गती तो बाहेरही निघायाचें कारण इतकेंच होते. परंतु इतकियांत कुंवर सुरजमल जाठ यांसहवर्तमान ठाकूर पेमसिंगजीही येऊन पावले. सुरजमलजीसीं व बख्तसिंगजीसी परम स्नेह. याजकरितां त्यांनीही बहुत कांहीं विचार केला कीं, इतके दिवस दक्षणी चौथाईचे ग्राहीक म्हणवीत होते. आतां सर्वस्व ग्राहीक जाले. आगरियां अमल दखलच केला. राहिली अजमेर. याचीही सनद हाती ठेवितात. फौज रामसिंगजीचे कुमकेनिमित्य गेलीच आहे. तुर्कीनीही तिकडेच डौल दिधला आहे. या गोष्टीची पैरवी आतांपासून केलिया उत्तम. त्यासीं सवाइजीनीं तर हाच जाब दिधला कीं, आमचें तर कांहीं त्यांनीं इतकें अधिक केलें नाहीं व स्नेहभावाचा विचार आपला भिन्न भिन्न आहेच. जरी ये समई केवळ रामसिंगजीकडेच पाहावें तर बख्तसिंगजीनीं जोधपूर घेतलें तें बजोरमर्दीने घेतले. व रामसिंगजी पाहतां नांवारीस. व सरदारांहीं त्याची कुमक विचारली असतां तटस्थच राहणें उत्तम. अथवा सरहद्देवर एखाद्या मातबराबरावर फौज देऊन पाठवावें, जिकडील सरशी पाहावी तिकडील गोष्ट सांगावी, हाही एक तटस्थतेचा विचार आहे. वरकड प्रसंग तर विना सार्वभौमादिकांविराहत होणें दुस्तर, तेव्हां, सुरजमल्लांनीं स्वीकार केला कीं, मजर्शी व बख्तसिंगजशि कोणेही रीतीनें द्वैतार्थ नाहीं. वजीरुलमुमालिकांसी व त्यांसी निपट एकोपा, ते ही निघावयासीं सिद्ध. बलके, सार्वभौमांसींही काहाडतील. या गोष्टीची मजबुती जे करावयाची ते करून घेतली आहे. पण मात्र ठाकूर प्रेमसिंगजी हजार स्वारप्याद्यांनिशीं समागमे दिधलें पाहिजे. ह्मणून राजीहि करून तिनी चारी दिवस पावतों राहून, शिक्रीं राहून, सैदांचा चाळिसां हजारांचा महालसेट मुरारजी व किशनजी यांचे येथें गहाण असतां ते जागा इनाम घेऊन पेमसिंगजी सहवर्तमान रुखसत होऊन गेले. त्यासी याचा मनसुबा हा दिसोन आला कीं, दिल्लीस जाऊन वजीरउमरावसार्वभौमादिकांसी भर भरून बाहेर काहाडून, एकदां काय आगरें व काय अजमेर या जिल्हेंत वजीरासी अथवा सार्वभौमासीं आणून, एकदां राजविराज करून, सर्व जमीदार राजे एकत्र होऊन, पुरुषार्थ करून दाखवावा! समदुःखी तो सकलही जाहलेच आहेत. जाटाचे खातरदारीस्तव यांनी पेमसिंगजीस त्यासमागमें दिधलें कीं, कितेक दिल्लींतील सनदअसनदाचें काम बाकी आहे तें संपादणें जरूर. दुसरें, राज्यीं बसल्यानंतर, दिल्लीस जाऊन सलाम केला नाहीं, बादशहा आहेत, न गेलिया....... यास्तव ऐसें दिसोन येतें जे कांहीं लोक...गेल्यानें राजकारणांचा जमाव जालिया तेथवरही जाऊन सलाम मुजरा करून यावें. त्यास, वजीरजीसीं तूर्त हजुरेंत फसले आहेत. रुकसत होत नाहीं. जावेदखानाशी व वजीरजीसीं अनबनाव. जाटासी वजीरासी स्नेह. त्यासीं हर प्रकारें काहाडून आग-यासी अथवा अजमेरकडे न्यावें, या उद्योगांत आहेत. बख्तसिंगजीसहि आशाबद्ध केलें आहे जे, उभयतांहि दिल्लीस जाऊन लवकरच वजीरासीं अथवा सार्वभौमास अथवा एकाद्या मातबरासीं लवकरच घेऊन येतों, तोंवर उतावळी न करणें. जरी इतकियांत उभयतांत युद्ध होऊन सरसी जालिया, जिकडील सरसी होईल तिकडील तजवीज केली जाईल. नाहीं तर, धीरेधीरें जें कांहीं होतें तें पाहतच आहों. म्हणून जात सुरजमलजी बहुतकरून तरतुदेंत लागलेसे दिसतात. मवाजी राठोड, व ख्तसिंगजीचा मामा, व हरनाथ टपासे हे उभयतां येऊन पावले. त्यांजबराबर सदाशिवभट, सवाई माधोसिंगजचे विद्यागुरु, यांजबराबर दोनी हजारनिशीं बिदा केलें. बाहियार्थी तर हेंच म्हटलें कीं, जेणेंकडून चुलत्यापुतण्यांत सोरप्यता प्राप्त होई....