Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १०६

श्री.
१६९६ चैत्र शुद्ध ५.

आशीर्वाद, उपरी, येथील क्षेम ता चैत्र शुध पंचमी मुा नजीक सांगोलें लष्करांत सुखरूप असों. विशेष. आपण राणू खोपडा याजबराबर पत्रें पाठविलीं ती सुरक्षित पावलीं. सविस्तर कळलें. वे अलिकडे जासुदबरोबर पत्रें पाठविलीं तींही पावलीं. वर्तमान कळलें. राजश्री हरीपंत तात्या फाल्गुन वद्य चतुर्दशीस लष्करांत आले. भेटी जाहाल्या. सविस्तर वृत येथील त्यांस निवेदन केलें. त्यांनींही आपल्या नजरेनें पाहिलें; व राजश्री मामांनीही कित्तेक सांगितलें तोहि भावार्थ कळला. तात्यांची मर्जी बोलण्यांत बरीच आहे. यांस खर्चाची निकड. रोज धरणींपारणीं. कूचास अडथळा. समई कूच होऊं न द्यावें, ऐसे कित्तेक प्रकार पोटाचे रडीमुळें. तो अर्थ तात्यांस आह्मीं उभयतांनीं व राजश्री भवानी शिवराम यांणीं साध्यांत निवेदन केला. व मामांनी आजपर्यंत सत्तर हजारावर दिल्हे, तेंहि सांगितलें. पुढें खर्चाचा बंदोबस्त करून द्यावा, ऐसें बोलिलों. त्यांनीं उत्तर केलें कीं, राजश्री मामासीं बोलतों आणि देवितों. त्यांचें मामांचें भाषण देवाजीपंताचे विद्यमानें होणे तें जाहालें. तेव्हां निश्चयांत आलें कीं, फालगुन मासपैकीं तीस हजार रुपये बाकी राहिली ते व चैत्र मासाचे ऐवजीं पंचवीस हजार एकूण पंचावन हजार द्यावे, तितकेयांत यांनीं आपला बंदोबस्त करून चालावें. ऐसें भवानी शिवराम यांस म्हणों लागले. तेव्हा यांनी उत्तर केलें कीं, सर्व अर्थ आपणास उमजले आहेत, मसलतीचे दिवसांत आम्हीं अडोन पोटास मागतों ऐसा अर्थ नाहीं, आमच्या लष्करांत कोणी सावकार नाहीं, पतपातेज राहिला नाहीं, मुलुखाचा पैसा यावा ऐसाहि आमचा प्रांत राहिला नाहीं, लाचारीस्तव आपणास विनंती करीतों, आम्हांस कर्ज द्यावें, एक मासाची पोटाची बेगमी पुर्तेच द्यावें, अधिकोत्तर न द्यावें,. एक मास आह्मांस निर्वेद लोकांपासून करावें, प्रसंगोपात आम्हीं उपयोगीं कैसे पडतों हें पाहावें. तेव्हां तात्यांनी रदबदल केली. त्यास, आणखी वीस हजार रुपये द्यावे, एकूण पाऊण लक्ष द्यावे, ऐसें जाहालें. मामांनीं रुक्ष भाषणेहि केलीं. उपाय काय ? त्यास, पाऊण लक्षानें यांचा परिणाम कैसा लागतो? यांस निदानीं दोन तरी कृताकृत पाहिजेत, तात्या आले. हे बंदोबस्त करतील. याअर्थी काल लोकांचा गवगवा भारी जाहाला. मामांचें कूच जाहालें, यांचें कूच न होई. डेरा पड़ों न देत. लोकांस पदर पसरून मिनत केली. कांहीं समजविलें; काहीं समजणें राहिलें. तों मामांस व तात्यांस वर्तमान कळलें कीं, लोक अडले आहेत. तेव्हां तात्या आले. त्यांनींहि लोकांस च्यार गोष्टी. सांगितल्या. त्रितीय प्रहर जाहला. तेव्हां कूच करावें ऐसें जाहालें ! त्यास मामांचा मुकाम सांगोलेयापलीकडे दोन तीन कोस. अविंधाचा मुकाम दोन तीन कोस अलीकडे. मामांजवळ जावें. परंतु दिवस थोडका राहिला. पोंहचणें कैसे होते ? तेव्हां तात्यांजवळ करार केला कीं, आज कूच करून अविंधाजवळ राहतों, उदईक लांब मजल करून तुम्हांजवळ येतों. ऐसा निश्चय करून, तात्या आपल्या मुकामास गेले. तात्यांच्या बोलण्याचा अर्थ पाहतां मामांची मर्जी राखावी. ते देतील तेच घ्यावे. त्याणे तर त्यांचा अर्थ सरत नाहीं. यजमानांनी तात्यांस म्हटलें जे, आम्हांजवळ कांहीं जवाहीर आहे व चार पांच हत्ती नामी आहेत, हे गाहाण ठेऊन तूर्त दोन लक्ष रुा आम्हांस द्यावे, म्हणजे एक महिन्याचा बंदोबस्त होतो, एका महिनेयांत मसलतहि सिद्धीस जाते, चिंता नाहीं. त्याचें उत्तर तात्यांनी केलें कीं, हें बोलणे ऐइकोन संकोच वाटतो. परंतु देतों, न देतों, हे बोलले नाहीत. निदानीं यांचा मनोदय होता की, या महिन्याचे लाख रुपये व बाकी मागील तीस हजार, एकूण एक लक्ष तीस हजारांनी पाऊण महिनेयाचा तरी बंदोबस्त होईल, तोहि प्रकार दिसत नाहीं ! त्यास, लोक फुटतात ऐसा प्रकार नाहीं; वे लढाईस कमी करतील ऐसेंहि नाही. परंतु पोटाची रड यामुळे हटकून काम घेणें, हुकमत करणें हें कमी पडेल. आपणास दोन चार वेळां लिहिलें कीं, लाख रुा महिना द्यावा ऐसा करार जाहाला आहे, तो देतीलच, परंतु आणखी कांहीं कर्जवाम देतील कीं न देतील, काय मर्जी आहे ? त्याचा अर्थ किमपि लिहिलाच नाहीं ! त्यास, मर्जी मनास आणून लिहून पाठवावें. सरकारच्या पत्रांचा मार लिहिला. त्यास, यांचे मानस जें, आह्मीं कार्यावर पड होऊन मसलत सिद्धीस नेली तर सर्व गोष्टी आमच्या नीटच आहेत, सेनासाहेब सुभा हे पद आमचें कोण नेतो, चाकरी करून दाखविणें हेंच मनोमानसीं आहे, दुसरा अर्थ नाहीं. अविंधाकडील मजकूर तरीः यांचे ठाई ममता फार आहे. तोहि मसलतीवर कायम आहे. ज्याबितजंग यास हरोल केलें आहे. दोन तीन कोस पुढें चालतो. आपण मागें चालतों. लांब मजली करितो. त्याचा मनोदय कीं, ज्याबीतजंग मामाचेहि पुढें हरोळीस असावा, त्याचे मागें ही फौज असावी. त्याचे मागें मामांनी व त्याचे मागें आपण असावें. परंतु, मामा एक, मजल लांब करितात. एक मुक्काम करितात. त्यामुळे त्यांच्या चालण्याची सोय बनत नाहीं. परंतु, लेढाईचे समई कवातीनें चालावें, हा भाव त्यांचा आहे. मामांची मर्जी पाऊणलक्ष खेरीज न द्यावें, ऐसी पाहिली, तेव्हां, कांहीं बोलिलों नाहीं. तात्यास मात्र पुसिलें कीं, याणें ठीक पडत नाहीं, पुरंधरास कांहीं चिठ्या करून देऊन समजावास पाडितों. त्यांनीं उत्तर केलें कीं, पंचवीसपर्यंत करा, आह्मीं लिहून पाठवितों. त्यास, घाटगे यांची वगैरे पंचवीसपर्यंत चिठ्या होतील, सूचना असावी. बहुत काय लिहिणे ? लोभ कीजे हे आशिर्वाद.