[५३]                                                                              ।। श्री ।।                                                         १६ फेब्रुवारी १७५७

 

विनंति सेवक सखाराम भगवंत कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. इकडील वर्तमान सविस्तर श्रीमंतांनीं लिहिलें आहे, विदित होईल. सारांश अबदालीची फौज भारी. तमाम रजवाडे तिकडे जाणार. बिजेसिंग, माधोसिंग यांचे वकील नेहमींच त्याजपाशीं आहेत. मुख्य दक्षणेचा११२ बंदोबस्त करावा हें सर्वांचे मानस आहे. आपली फौज व मल्हारबाची झाडून जमा व्हावयास फाल्गुन अखेर लागेल. तूर्त जयनगरचें रोखें जात आहों. वाटेनें राणाजी कोठेवाला याजकडे बाकीचा सालजाब होईल तो करावा तों फौजाहि येतील. भारी होऊन जावें तों कोणे रोखे होतों हे पाहून सडे होऊन गांठ घालावी हा विचार आहे. गोष्ट तुर्त सर्व प्रकारें भारीच आहे. आपली फौज बेदिल. हें आपणांस विदितच आहे. तथापि स्वामींचें पुण्य थोर आहे. विना याचें पारपत्य जाल्याखेरीज सोडावेसें नाहीं. पुढें जसें वर्तमान होईल तसें विदित होईल. त्याप्रमाणें तर्तुद करावी लागेल...... श्रुत होय. हे विज्ञापना.

पै॥ छ १८ रज्जब, सन सबा.
मु॥ श्रीरंगपट्टण.