[४०] ।। श्री ।। ३ अक्टोबर १७५४
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुह्मी पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. गंगावन तुह्मी पाठविलें तें पावलें. मार्गीं आगरीयासी जाटांनीं लुटलें. दुसरें चवरीबद्दल गंगावनें पाठविलीं आहेत ह्मणोन लिहिलें. त्यास, हुजूर आलियावरी जाब लिहिला जाईल. राउत सीबंदी आहे. त्याची सनद पाठवावी ह्मणोन लिहिलेत त्यास, पेशजी गोपाळराव गणेश याणी तुह्मास नेमणुक करून दिल्हीच आहे. त्याची सनद हुजूरची असावी. त्यास, खासास्वारी त्या प्रांतास आलियावरी मनास आणून आज्ञा करणें ते केली जाईल. हल्लीं सफदरजंग कोठें आहेत? पुढें इरादा त्याचा काय? हें सविस्तर वरिचेवरी लिहीत जाणें. साठ हजार रुपये धनवडसींगापासोन तनखाचे ऐवजीं पावले ते त्याणींच मार्गांत दगा करून घेतले. याजकरितां जजावल? सफदरजंगाचे तुह्मी धनवडसिंगावरी केले आहेत. त्यास ते रुपये आले किंवा नाहीं हें लिहीणें. जाणिजे. छ १५ जिल्हेज.
लेखन सीमा