[३३] पै॥ छ ५ रजब ।। श्री ।। ११ एप्रिल १७५४
राजाश्रियाविराजित राजमान्यराजश्री बाबूरावजी स्वामी गोसावी यांसः-
पोष्य रामाजी अनंत स॥ नमस्कार विनंति येथील कुशल तागायत चैत्रवद्य९१ ४ मु॥ प्रांत जाटवाडा ठाणें कुंभेर जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. तेथें कितेक मजकूर. नवाबाच्या शैन्यांत आल्यानंतर त्यासी बोलाचाली जाल्याचें वृत्त ता॥वार लिहिलें तें कळलें. ऐशास, त्याचा जाबसाल श्रीमंत राजश्री दादासाहेब तुह्मास लिहितील त्यावरून कळेल. त्याच्या आज्ञेप्रमाणें वर्तणूक करणें. सारांश गोष्ट कीं तुमचें येथें प्रयोजन नसिलें तरी मग उगेंच तेथें राहावेंसें काय आहे? येथें खावंदाजवळी येऊन वर्तमान सांगावें. मग पुढें जशी आज्ञा करतील त्याप्रमाणें वर्तणूक करावी. कागदीपत्रीं कांहीं काम होतें असा अर्थं नाहीं. राजश्री गोपाळराव कौलेस आहेत. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.