[३२] पै॥ छ ५ रजब ।। श्री ।। १० एप्रिल १७५४
राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसिः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत. सु॥अर्बा खमसैन मया अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. तेथें नवाबखान९० लष्करांत आल्यावरी, त्यासीं संभाषण केल्यावरी त्याच्या जाबसालाचें वृत्त तपशिलें लिहिलें तें सविस्तर कळलें. ऐशास, येविसी जें लिहिणें तें श्रीमंत राजश्री दादासाहेब यांणीं तुह्मास लिहिलेंच आहे. त्याप्रे॥ वर्तणूक करणें. जाणिजे. छ १६ माहे जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
शिक्का
मोर्तब सुद