[५]                                                                ।। श्री ।।                                                               ७ सप्टंबर १७५१

 

पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसीः-

विज्ञापना ऐसीजे. सेवक येथें आलिया उपर नसीरजंग याच्या चार भेटी जाल्या. त्याचा आशय मनास आणितां स्वामीसीं कोणेहि प्रकारे बिघाड न करावा व होऊं न द्यावा; दारमदारने चालावें; ऐसे दृष्टीस पडलें. राजाजीच्या दोन भेटी जाल्या. त्याचा आशय अंतस्थ मनास आणिता बिघाडाची बहुताशी खुरखुर आहे. नसिरजंग सेवेसी मिलाफी आहेत ऐसे लेखोन, याचे वजन बहुत भार यास्तव बाह्मात्कारे यासी बहुतसी लोलिंगता२५ करितात. परंतु अंतर्यामी यासहि दुजाणात२६ नाहीत. वराडाची सुभेदारी यास दिल्ही, याचा सबब२७ या राखलेतून२८ कोणेहि प्रकारे यांस काढावे. याच प्रकारे राजश्री जानोजी निंबाळकर यांसहि जाणतात. परंतु दोघेहि मातबर आहेत. पुढें अमलांत काय येते ते अढळलियावर सेवेसीं लिहिलें जाईल. राजाजीचे सलाहकार मोठे अबदुलखैरखां व खुदावंदखां आहेत; त्यांस पाचारणी गेली आहेत. दस-याअलीकडे२९ तेहि येऊन पोचतील. आणि त्यांचे विचारें कुच करणार. वरकड राजाजींही निगादास्त३० केली व करणार. त्याचा अंतस्थ शोध करितां आजतागायत फौजेचा व जिनसीचा बंदोबस्त व निगादास्त केली आहे, त्याची याद अलाहिदा जिन्नस पाठविली आहे. त्यावरून कळो येईल. बाणदार दर असामी दरमहा रु. १० प्र ।। करार करावा. दहा असामींपासून वीसपर्यंत ठीक केले आहेत. माणसें कसबी आहेत. त्यांस दुमहा३१ येथे खर्चास द्यावा लागतो. त्यास जामीन देतील. स्वामीची आज्ञा होईल त्याप्रमाणे खर्चास देऊन रवाना करून+ व शिसेंहि ठीक केलें आहे. येथून गंगेपर्यंत पावतें होईल. तेथून पुढे न्यावयास पूर्वी रा. राघो गोविंद यांस पत्र आणिलें आहे. त्याप्रमाणे पाठविले पाहिजे. स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.