व बंदहाय पातशाई की जे कोणी जागीरात खात असतां चाकरी नाहीं करीत जागीरात त्याची दाखल सरकारवालांत करवूं आणि त्यांतून चौथ आपली घेऊं; व आपले कौल करारासी न फिरूं; आणि जनाब अकदस व नवाबबहादरासी एकसर मुतफावत न करूं; व जन्मपरियेंत ताबेदार व फर्माबरदार राहू. व जर आह्मास दक्षणेस जावयाचा अगत्य पडला तरी कारणें बंदगी जनाब अकदस व तंबीह व पारपत्य मुफसीदाचें कार्याकारण फौज सोडोन जाऊं; व आह्मी ज्या वायद्याचा करार करून जाऊं; त्याच कराराप्रों। येऊं व सीपारस लहानथोरासी समजोनच करूं. आणि एहकाम शरीयतचे जारी राहत आह्मी मुकव्वी राहूं, व रसमीयात हिंदूचीहि आमचे धर्माप्रों। जारी राहात, कोण्ही मुजाहीम त्यांचा न होय. आणि तीस लक्ष रुपये की कारणें मोहम अबदालीचे इनायत जाहाले काय येंदा व काय आइदे की ज्यावेळेस अबदाली येईल आज्ञेप्रमाणें त्याचे पारपत्यास यत्न करूं

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जे जहागीरदार सरकार चाकरी करीत नसतील त्यांच्या जहागिरी सरकरांत दाखल करूं, व त्यातून आपली चौथ काढू घेऊं; आणि केलेल्या कौलकराराशीं कधींहि फिरणार नाहीं. तसेंच हुजूरशीं व नवाबबहादराशीं कधींहि तफावत करणार नाहीं. आणि जन्मपर्यंत आपले ताबेदार राहूं. आह्मांस जर दक्षणेस जाण्याचे अगत्य पडलें तरी हुजूरच्या चाकरीकरितां व शत्रूंच्या पारिपत्याकरितां येथें फौज ठेवून जाऊं. तसेंच जो वायदा करून जाऊं त्याप्रमाणें बिनचूक परत येऊं. लहानथोरांची शिफारस आपल्यापाशी विचारपूर्वक करूं. आह्मी मुसलमानांच्या व हिंदूंच्या धर्मांचें संरक्षण करूं. कोणाला अडथळा करू देणार नाहीं. ज्याअर्थी अबदालीवर मोहीम करण्याकरिता तीस लक्ष रुपये आपण आह्मास दिले आहेत त्या अर्थी अबदाली ह्या अगर पुढील वर्षी आल्यास त्याचें पारिपत्य करण्यास यत्न करूं.