[२८३] ॥ श्री ॥ २३ फेब्रुवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी३२६ गोविंदस्वामी गोसावी यांसिः
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊसाहेब यांनीं राजश्री नारो शंकर यांस गुदस्ताचे समजाविशीचे ऐवजी एक लक्ष रुपयांची वरात तुह्मावरी दिली. त्यास तुह्मीं वरातेचा ऐवज अद्याप दिला नाहीं, ह्यणून हुजूर विदित झालें. त्याजवरून हें पत्र लिहिलें असे. तरी वरातेप्रें॥ऐवज मशारनिल्हेस पत्रदर्शनीं पावता करणें. येविषयीं फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ ३० रमजान सु॥ सन इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.